Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, कुठे ऊन तर कुठे पाऊस घालणार थैमान, 11 जिल्ह्यांना मोठी भीती

मुंबई तक

Maharashtra Weather : नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने आवाहन केलं आहे. जाणून घ्या 29 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील पुढील काही तास हे हवामानाच्यादृष्टीने धोक्याचे

point

दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी

Maharashtra Weather : राज्यातील पुढील काही तास हे हवामानाच्यादृष्टीने धोक्याचे आहेत. हवामान विभागाने उन्हाचा चटका अधिक जाणवेल अशी माहिती दिली. तसेच याचा काही जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट सोसावा लागणार आहे. अशातच नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने आवाहन केलं आहे. जाणून घ्या 29 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : बुधवार पेठेत कारवाई, कथित वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; 14 बांगलादेशी नागरिकांसह 18 जण ताब्यात

कोकण 

कोकण विभागात हवामान तुलनेनं दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सकाळी आर्द्रता जाणवण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान हे उष्ण आणि कोरडं रहील अशी शक्यता वर्तवली आहे. दुपारी उकाडा अधिक जाणवणार असून काही भागांत उष्ण वाऱ्यांचा अधिक प्रभाव जाणवेल. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर दुसरीकडे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी कोरडे वातावरण राहील असा हवामानाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?