कोल्हापूर हादरलं, 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केले लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवत वेगवेळ्या लॉजवर...
Kolhapur crime : 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना बदनामीची धमकी देत शाहिद सनदीने क्रूरतेची परिसिमा ओलांडली. या घटनेत बळी पडलेल्या तरुणींपैकी एक तरुणी पुढं आली आणि नंतर हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याची माहिती समोर आली असा आरोप आहे. अत्याचार करणाऱ्या शाहिद सनदीला सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापूरमध्ये मोठं सेक्स स्कँडल
पीडितांना वेगवेगळ्या लॉजवर नेत अत्याचार केल्याचा आरोप
Kolhapur Crime : धनंजय साबळे - हिंदू समाजातील 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना बदनामीची धमकी देत शाहिद सनदीने क्रूरतेची परिसिमा ओलांडली. या घटनेत बळी पडलेल्या तरुणींपैकी एक तरुणी पुढं आली आणि नंतर हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याची माहिती समोर आली असा आरोप आहे. अत्याचार करणाऱ्या शाहिद सनदीला सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शाहीदला अटक केली, त्याला 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा : डोंबिवली : 'चल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार करु', पण मित्राने तरुणीला नेलं निर्जनस्थळी; अन्...
कोल्हापूरमध्ये मोठं सेक्स स्कँडल
अशातच शाहिद सनदी आणि शाहरूख देसाईच्या तपासासाठी एसआयटीचे पथक स्थापन करा, अशी गावकऱ्यांनी मागणी केली. तसेच शिरोली बंद ठेवत सनदीचा पाणी-वीज पुरवठा खंडीत करून कुटुंबियांना गावातून हकलवण्याचा इशारा देण्यात आला होता. शाहीद सनदीनं गावातील हिंदू मुलींचे शोषण केल्याचं उघडकीस आलं, असा आरोप करण्यात येत आहे, या घटनेनं संपूर्ण शिरोली ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.
शाहीद सनदीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी
या प्रकरणाच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आलं. तसेच गावाच्या कमानीजवळ समस्त हिंदू बांधवांनी धाव घेतली. याच प्रकरणी निदर्शने करत जमाव आक्रमक झाला. यामुळे पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात झाला. शाहीद सनदीची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात आली. सनदीची मदत करणाऱ्या शाहरूख देसाईला तात्काळ अटक करा, अशा नराधमांना पाठिंबा देणाऱ्यांचा पर्दाफाश करा अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या.
पीडितांना वेगवेगळ्या लॉजवर नेत अत्याचार केल्याचा आरोप
शाहीद सनदीने मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना अनेक आमिष दाखवले. कोल्हापूर आणि शिरोलीत वेगवेगळ्या लॉजवर नेते अत्याचार केला. अनेक दिवसांपासून त्याचे हे कृत्य सुरुच होते. त्याने पीडित तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ तयार केले होते, नंतर त्याच व्हिडिओचा वापर करत ब्लॅकमेल केले. अनेक मुली बदनामीला घाबरू लागल्या आणि त्याच्या सांगण्यावरून वागू लागल्या होत्या.









