आधी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, राज्यभर चर्चा होताच पार्थ पवारांचं ट्वीट करत स्पष्टीकरण; म्हणाले...
Parth Pawar on VSR plane travel : खासदार पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानं राज्यभरात उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. अखेर पार्थ पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी VSR च्या विमानातून प्रवास
राज्यभर चर्चा होताच पार्थ पवारांचं ट्वीट करत स्पष्टीकरण; म्हणाले...
Parth Pawar on VSR plane travel : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ज्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन झाले, त्याच कंपनीच्या विमानाने पार्थ पवारांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, खासदार शरद पवारासोबत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी या विमानाचा वापर केला.
एकीकडे आमदार रोहित पवारांनी या VSR कंपनीवर गंभीर आरोप केले असताना आणि खुद्द जय पवारांनी कारवाईची मागणी केलेली असताना, पार्थ पवारांनी घेतलेल्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता पार्थ पवारांनी 'X' (ट्विटर) वर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा : बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? 'त्या' संपूर्ण कुटुंबाचा नेमका कसा झाला अंत?









