पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण
BJP worker shot dead in Pune : पुण्याच्या देहूरोड परिसरात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण
BJP worker shot dead in Pune : पुण्यातील देहूरोड परिसरात मंगळवारी (दि.28) रात्री खळबळजनक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून, हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांच्यावर तब्बल 16 राउंड फायर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेड्डी हे सवाना चौक परिसरात असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या गोळीबारात एक गोळी थेट त्यांच्या डोक्यात लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे देहूरोड परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
जुन्या वादातून टोळीयुद्धाचा भडका; भावाच्या हत्येशी कनेक्शनचा संशय
रमेश रेड्डी यांच्या हत्येचा संबंध त्यांच्या कुटुंबातील जुन्या वादांशी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीशी जोडला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी रमेश यांचे भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांची एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. विक्रम रेड्डी यांच्या हत्येतील आरोपी सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. या जुन्या प्रकरणातील वादातून किंवा त्या केसमध्ये तडजोड (कॉम्प्रोमाइज) करण्यावरून काही वाद सुरू होता का, या कोनातून पिंपरी चिंचवड पोलीस आता कसून तपास करत आहेत. रमेश रेड्डी हे भाजपशी जोडलेले असले तरी त्यांचे नाव मटका व्यवसायाशीही जोडले जात होते, मात्र सध्या हा व्यवसाय बंद असल्याचे सांगितले जात आहे. भावाच्या हत्येचा बदला किंवा वर्चस्वाच्या लढाईतून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र.. विधान परिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, 'यांना' दिली संधी
गोळीबाराने देहूरोड हादरले; परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा
घटनेची माहिती मिळताच देहूरोड परिसरात मोठी खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांसह रेड्डी समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपूर्ण परिसरात जड पोलीस बंदोबस्त तैनात केला असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे पूर्ण तयारीनीशी आले होते आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे रेड्डी यांना वाचण्याची संधी दिली नाही. ज्या क्रूरतेने ही हत्या करण्यात आली आहे, त्यावरून हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे पुणे शहर आणि लगतच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून भरवस्तीत झालेल्या या गोळीबाराने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.









