काँग्रेससाठी खूपच मोठी Good News.. 'इथे' येणार त्यांची सत्ता, कोण होणार मुख्यमंत्री?
Kerala Exit Poll: दक्षिण भारतातील केरळ हे एकमेव राज्य आहे, जिथे डावे दहा वर्षांपासून सत्तेत आहेत. एक्झिट पोलनुसार डाव्यांचा पराभव होऊन यूडीएफचे पुन्हा सत्तेत पुनरागमन होईल असे संकेत मिळत आहेत. जर हे एक्झिट पोल निकालांमध्ये खरे ठरले, तर भारत डाव्यांपासून मुक्त होईल का?
ADVERTISEMENT

तिरुवनंतपूरम: केरळ विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. भारतातील डाव्या आघाडीचा एकमेव बालेकिल्ला असलेले केरळ, दहा वर्षांनंतर कोसळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, पिनारयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला (LDF) मोठा धक्का बसला आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF)दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत परतताना दिसत आहे.
राज्यातील 140 विधानसभा जागांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि सरकार स्थापन करण्यासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. एक्झिट पोलनुसार, डावे सत्तेतून बाहेर पडतील, तर काँग्रेस सत्तेत परत येईल असा अंदाज आहे. दहा वर्षांपासून सत्तेबाहेर असलेला यूडीएफ पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे.
ॲक्सिस माय इंडियानुसार, यूडीएफला 78 ते 90 विधानसभा जागा मिळतील, तर एलडीएफला केवळ 55 जागा मिळतील असा अंदाज आहे. यूडीएफला 44 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे, तर एलडीएफला 39 टक्के मते मिळू शकतात. यावेळी भाजपला 14 टक्के मते मिळू शकतात.
कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे?
- यूडीएफ - 78 ते 90 जागा
- एलडीएफ - 49 ते 55 जागा
- भाजप - 0 ते 3 जागा
हे ही वाचा>> Exit Poll: प्रत्येकाचा अंदाज चुकवणारा निकाल, प. बंगालमधील एक्झिट पोलमधील धक्कादायक आकडे एकदा पाहाच!
कोणाला किती मतांचा वाटा मिळण्याची शक्यता?
- यूडीएफ - 44%
- एलडीएफ - 39%
- भाजप इतर - 14%
केरळमधून डाव्यांचा होऊ शकतो सुपडा साफ
जर 4 मे रोजी एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले, तर केरळमधील डाव्यांचे सत्तेतून बाहेर पडणे हा केवळ पराभव नसून एक मोठा राजकीय धक्का असेल. 73 वर्षांत पहिल्यांदाच भारतातील कोणत्याही राज्यात डाव्या आघाडीचे सरकार सत्तेत राहणार नाही. योगायोगाने, वर्षानुवर्षे केंद्रात डाव्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाने देशाला 'डाव्यांपासून मुक्त' करण्याची ही कामगिरी करून दाखवू शकतं.









