Exit Poll: प्रत्येकाचा अंदाज चुकवणारा निकाल, प. बंगालमधील एक्झिट पोलमधील धक्कादायक आकडे एकदा पाहाच!

मुंबई तक

West Bengal Election Exit Poll: प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण एक्झिट पोल्समध्ये भाजपला बहुमताची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर टीएमसीला 15 वर्षांनंतर सत्ताबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

west bengal exit poll result that defied everyones predictions take a look at exit poll figures from west bengal
West Bengal Election Exit Poll
google news

कोलकाता: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा अखेरचा टप्पा आज (29 एप्रिल) पार पडला. यामध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानानंतर देशभराचे लक्ष एक्झिट पोल्सकडे लागले आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाची 15 वर्षांपासून अबाधित सत्ता असलेल्या बंगालमध्ये यंदा भाजपने (BJP) प्रचंड कडवी टक्कर दिली असल्याचे एक्झिट पोल्स सांगत आहेत. चार प्रमुख रिसर्च एजन्सींच्या एक्झिट पोल्सपैकी तीनमध्ये भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टीएमसीने 2011 पासून सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून सत्ता राखली आहे. मात्र, यंदा मतदारांच्या मनात बदल झाल्याचे संकेत एक्झिट पोल्स देत आहेत. बहुमतासाठी 148 जागांची गरज असलेल्या 294 सदस्यांच्या विधानसभेत भाजपला 140 ते 170 जागांपर्यंत मजल मारल्याचे अंदाज आहेत. डीव्ही रिसर्चचा 

पाहा कोणत्या रिसर्च कंपनीने प. बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत नेमका काय Exit Poll 

1. डीव्ही रिसर्चचा (DV Research) एक्झिट पोल

  • TMC: 158 ते 174 जागा
  • भाजप: 116 ते 132 जागा
  • इतर: 02 ते 04 जागा

या पोलनुसार टीएमसी बहुमताच्या पार पोहोचू शकते, पण मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये मोठी घट होत असल्याचं पाहायला मिळतंय.

हे ही वाचा>> समजून घ्या: निवडणूक आयोगाचा थेट पहारा! ऐन निवडणुकीत कोणते नवे नियम?

2. चाणक्य स्ट्रॅटेजीजचा (CHANAKYA STRATEGIES) एक्झिट पोल

  • TMC: 130 ते 140 जागा
  • भाजप: 150 ते 160 जागा
  • काँग्रेस: 02 ते 04 जागा
  • इतर: 04 ते 06 जागा

चाणक्य स्ट्रॅटेजीजने सर्वात आक्रमक अंदाज व्यक्त केला आहे. यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे.

हे वाचलं का?