एकटीच असल्याचा गैरफायदा घेत नराधम घरात शिरला, MBA च्या विद्यार्थीनीवर दुकानदाराकडून पाशवी बलात्कार
crime news : किराणा दुकानदाराने MBA चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीच्या घरात घुसून घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत तिची आब्रू लुटली. या प्रकरणी आरोपी किराणा दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
MBA चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या खोलीत शिरून दुकानदाराने लुटली आब्रू
आरोपीवर गुन्हा दाखल
Crime News : ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वरमध्ये लाज आणणारी घटना घडली आहे. एका किराणा दुकानदाराने MBA चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीच्या घरात घुसून घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत तिची आब्रू लुटली. या प्रकरणी आरोपी किराणा दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? 'त्या' संपूर्ण कुटुंबाचा नेमका कसा झाला अंत?
MBA चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या खोलीत शिरून दुकानदाराने लुटली आब्रू
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली होती. पीडित विद्यार्थीनी छत्तीसगडच्या विलासपूर येथील रहिवासी आहे, ती भुवनेश्वर येथे MBA चं शिक्षण घेत होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तेव्हा पीडित तरुणी खोलीत एकटीच होती, तिची रूममेट 24 अप्रिल रोजी काही कारणानिमित्त बाहेर गेली होती. पीडित विद्यार्थीनी शुक्रवारी किराणा मालाच्या दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती.
तरुणी एकटीच असल्याचं पाहून नराधमानं साधला डाव
दुकानदार सामान देण्याच्या बहाण्याने तिच्या खोलीपर्यंत पोहोचला. घरात कोणीही नाही, तरुणी एकटीच असल्याचं पाहून नराधमाने डाव साधला. त्याने पीडित विद्यार्थीनीवर जबरदस्ती करत तिचं लैंगिक शोषण केलं. पीडितेनं जबाब नोंदवण्यासाठी इन्फो व्हॅली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
आरोपीवर गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 64(1) आणि 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज आणि अन्य परिस्थितीची माहिती मिळवली. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आणि पीडित विद्यार्थीनीची ओळख पटवली आहे.









