Maharashtra Weather : मे महिन्यात सूर्यदेव आग ओकणार, 3 जिल्हे सुपरहॉट, IMD चा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : 1 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्ध्यात उष्णतेचं सावट असून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय, अशातच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

1 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं

point

बहुतांश भागात उष्णतेची लाट

Maharashtra Weather : राज्यात एप्रिल महिन्यात दुहेरी हवामानाची परिस्थिती होती. अशातच 1 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्ध्यात उष्णतेचं सावट असून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय, अशातच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : भाजप नेत्याचं कांड, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण, कुटुंबीयांनी देखील.. लाज आणणारी घटना

कोकण 

कोकण विभागात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील अशी शक्यता आहे, तसेच कोकण किनारपट्टीलगत हवामान दमट राहील. दुपारी घराबाहेर पडताना उन्हापासून काळजी घ्यावी, असा हवामानाच इशारा आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमान कायम राहणार आहे, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात उष्णतेचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हे वाचलं का?