Maharashtra HSC Result 2026 LIVE: उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल, 'ही' आहे निकालाची थेट लिंक
Maharashtra HSC Result 2026 LIVE, MSBSHSE Class 12 Results Direct Link: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल उद्या, 2मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होईल. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात.
ADVERTISEMENT

Maharashtra Board HSC Result 2026 Direct Link: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)2 मे, 2026 रोजी 12वी (HSC) चा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात. निकाल Digilocker वरही जाहीर केला जाईल. बोर्डाने सांगितले आहे की निकालाची लिंक दुपारी ठीक 1 वाजता सुरू केली जाईल. त्यामुळे, लाखो विद्यार्थ्यांनी पूर्णपणे तयार राहावे आणि आपले रोल नंबर जवळ ठेवावेत.
यापूर्वी सकाळी 11 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित केली जाईल. या बोर्ड निकालाविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मुंबई Tak च्या mumbatak.in वेबसाइटवर पाहायला मिळतील.
या वेबसाइट्सवर पाहा तुमचा निकाल
निकाल कसा पाहावा?
- तुमचा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सना भेट द्या.
- होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
- तुम्ही 'Submit' बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या गुणपत्रिकेची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट नक्की घ्या.
Maharashtra HSC Result 2026 LIVE: MSBSHSE Board 12th Result, Scorecard Download Link
हे ही वाचा>> Maharashtra Board HSC Result 2026 Date Time LIVE: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर, Result ची वेळही आली समोर
Maharashtra HSC Result 2026: डिजीलॉकर सुविधा
विद्यार्थी डिजीलॉकर ॲप किंवा वेबसाइटवरून त्यांच्या डिजिटल गुणपत्रिका देखील डाउनलोड करू शकतात. यासाठी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आवश्यक असेल.
Maharashtra HSC Result 2026: परीक्षा कधी झाली?
Maharashtra HSC इयत्ता 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान घेण्यात आल्या.









