बॉयफ्रेंडच्या 3 चुकांमुळे सिया सापडली, थंड डोक्याने केलेल्या खुनाचा पोलिसांकडून उलगडा

मुंबई तक

Ketan Agarwal Murder Case : लोहगड किल्ल्यावर झालेला केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसून नियोजित हत्या असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीतील एका हुडी घातलेल्या व्यक्तीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले. पोलिसांनी कशाच्या आधारे आरोपींना शोधलं? जाणून घेऊयात..

ADVERTISEMENT

Ketan Agarwal Murder Case
Ketan Agarwal Murder Case
google news

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडच्या 3 चुकांमुळे सिया सापडली

point

थंड डोक्याने केलेल्या खुनाचा पोलिसांकडून उलगडा

Ketan Agarwal Murder Case : लोहगड किल्ल्यावर पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यूचे प्रकरण सुरुवातीला दुर्दैवी ट्रेकिंग अपघात म्हणून समोर आले होते. मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. 18 जून रोजी किल्ल्यावरील तिकीट काउंटरजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केतन अग्रवाल आणि त्यांची होणारी बायको सिया गोयल चालताना दिसत होते. त्यांच्यामागे एक व्यक्ती हुडी घालून संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. काही तासांनंतर केतन यांचा मृत्यू झाला. या फुटेजमधील व्यक्तीची ओळख नंतर चेतन चौधरी अशी पटली, जो सियाचा बॉयफ्रेंड आहे. जून महिन्यात तब्बल 33 अंश सेल्सिअस तापमान असताना एखादी व्यक्ती चेहरा झाकणारी हुडी का परिधान करेल, हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला आणि याच संशयातून सखोल चौकशीला सुरुवात झाली.

हेही वाचा : लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..

CCTV मध्ये हुडी घातलेल्या व्यक्तीचा चेहरा झाकलेला दिसला 

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्यामध्ये हुडी घातलेल्या व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असल्याचे दिसून आले. त्याने हुडीवर हेडसेटही घातला होता. एका दुसऱ्या फुटेजमध्ये सिया गोयल मागे वळून पाहताना दिसत असून त्याच क्षणी हुडी घातलेला व्यक्ती अचानक बसल्याचे आढळले. या हालचालींमुळे संशय आणखी वाढला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 18 जून रोजी चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल फोन आपल्या दुकानातच ठेवला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रॅक होऊ नये. त्याने एका कर्मचाऱ्याचा फोन वापरल्याचा संशय आहे. याशिवाय सकाळी 7 ते सायंकाळी 5.40 वाजेपर्यंत त्याच्या मोबाईलवरील इंटरनेट सेवा बंद होती. त्या दिवशी त्याच्या क्रमांकावर आलेल्या कॉल्सना स्वतः चेतनने उत्तर दिले नसून दुकानातील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचेही तपासात समोर आले.

हेही वाचा : केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!

हे वाचलं का?