Maharashtra HSC 12th Result 2026 : बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता, तुमची मार्कशीट डाऊनलोड करण्याची सोप्पी पद्धत

मुंबई तक

MSBSHSE Class 12 Result 2026 Latest Updates: महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही संबंधित वेबसाइटवर तुमचा निकाल पाहू शकता. पण त्यासाठी कोणत्या वेबसाईटवर जायचं, मार्कशीट कसं डाऊनलोड करायचं ते जाणून सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख काल (30 एप्रिल) जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12 वी) चा निकाल जाहीर करेल. निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल, त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर निकालाची लिंक अॅक्टिव्हेट करण्यात येईल. 

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र बोर्ड टॉपर्सची यादी जाहीर करत नाही. यावर्षीही टॉपर्सची नावे बोर्डाकडून जाहीर केली जाणार नाहीत. निकाल विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक प्रवाह, आयटीआय या स्ट्रीम्सनुसार जाहीर केला जाणार आहे.

कोणत्या वेबसाइटवर निकाल पाहता येईल?

महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर खाली दिलेल्या वेबसाइटवर आपल्याला निकाल पाहता येईल. विद्यार्थी आणि पालक खाली देण्यात आलेल्या साइट्सचा वापर करून निकाल तपासू शकतील.

हे ही वाचा>> Maharashtra HSC Result 2026 LIVE: उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल, 'ही' आहे निकालाची थेट लिंक

  • mahresult.nic.in
  • results.gov.in
  • results.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • mahahsscboard.in

हे ही वाचा>> Maharashtra Board HSC Result 2026 Date Time LIVE: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर, Result ची वेळही आली समोर

तुमची मार्कशीट अशी करा डाऊनलोड

महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर होताच, विद्यार्थ्यांना आधी वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जावे लागेल आणि साइटच्या होम पेजवरील निकालाच्या सक्रिय लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव प्रविष्ट करावं लागेल आणि 'Result' या बटणावर क्लिक करावं लागेल. आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. इथेच तुम्ही तो डाउनलोडही करू शकता.

हे वाचलं का?