22 वर्षीय विवाहिता 55 वर्षीय सरपंचासोबत फरार, कसं जुळलं प्रेम? नवऱ्यानं काय सांगितलं?
बायको केवळ प्रियकरालाच घेऊन पळाली नाही तर जाताना घरातील लाखो रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने नेल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
22 वर्षीय विवाहिता 55 वर्षीय सरपंचासोबत फरार
कसं जुळलं प्रेमप्रकरण?
नवऱ्यानं काय सांगितलं?
Crime News : एका 22 वर्षीय विवाहितेने आपल्यापेक्षा तब्बल 33 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत पलायन केले आहे. आणि तो व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून गावचा सरपंच आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा रंगली आहे. याप्रकरणी पीडित नवऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. बायको केवळ प्रियकरालाच घेऊन पळाली नाही तर जाताना घरातील लाखो रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने नेल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे. उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील ही घटना आहे.
सरपंच अन् बायकोमध्ये वाढली जवळीक
मिळालेल्या माहितीनुसार, मऊरानीपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न 2024 मध्ये झाले होते. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला होता, मात्र हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पीडित तरुणाचा आरोप आहे की, गावातील सरपंचाचे त्याच्या घरी सतत येणे-जाणे असायचे. याच काळात सरपंच आणि त्याच्या बायकोमध्ये जवळीक वाढली. या अनैतिक संबंधांमुळे नवरा-बायकोमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते. तरुणाने अनेकदा या नात्याला विरोध केला, मात्र बायकोने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
हे ही वाचा : 'वडिलांचे अंत्यसंस्कार झाले , तिथेच आमचे..'; नागपुरात माय-लेकीचं टोकाचं पाऊल, पोलिसांना वेगळाच संशय
अखेर सरपंचासोबत केलं पलायन
पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, 29 एप्रिलच्या संध्याकाळी तो घरी नसताना त्याची बायको सरपंचासोबत पसार झाली. घरातील कपाटात ठेवलेले 2 लाख 40 हजार रुपये रोख आणि मौल्यवान दागिने ती सोबत घेऊन गेली आहे. गल्लीतील काही नागरिकांनी त्या दोघांना एकत्र जाताना पाहिल्याचेही समोर आले आहे. बायकोने प्रियकराच्या सांगण्यावरून आपले सुखी घर उद्ध्वस्त केल्याचे सांगत तरुणाने आता न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपी सरपंच हा राजकीय प्राबल्य असलेला व्यक्ती असल्याने पीडित कुटुंब धास्तावलेले आहे.
हे ही वाचा : 'बायकोचे तीन पुरुषांशी संबंध आहेत..' सॉफ्टवेअर इंजिनिअरने संपवले आयुष्य, 19 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
सरपंचाचा शोध सुरु
या गंभीर प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस ठाणे प्रभारींनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नवऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबावरुन दोघांचा शोध घेतला जात आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. विवाहितेने सरपंचासोबत पलायन केल्याच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली आहे.









