'मला चार वर्ष बायको बनवून ठेवलं अन्..', पोलीसासोबत चार वर्ष Live-in मध्ये राहणाऱ्या तरुणीने आयुष्य संपवलं

मुंबई तक

Crime News : पीडितेने मृत्यूपूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, आरोपीने तिला पत्नीप्रमाणे चार वर्षे सोबत ठेवले होते. जेव्हा तिने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने कुटुंबाचे कारण पुढे करून नकार देण्यास सुरुवात केली. आरोपी तिला केवळ लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंधांसाठी वापरत होता आणि नंतर तिच्यापासून दुरावू लागला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'मला चार वर्ष बायको बनवून ठेवलं अन्..',

point

पोलीसासोबत चार वर्ष Live-in मध्ये राहणाऱ्या तरुणीने आयुष्य संपवलं

Crime News : पोलीस कॉन्स्टेबलने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत एका तरुणीने आत्महत्या केलीये.. प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या फसवणुकीमुळे खचलेल्या तरुणीने अखेर टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली असून, कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. उत्तर प्रदेशातील आग्र्या शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु मृत्यूला कवेत घेण्यापूर्वी तिने समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला, ज्याने संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. 

हेही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने वार, हल्ल्यानंतर आरोपीने आत्महत्या करत संपवले जीवन

पोलीस कॉन्स्टेबलकडून चार वर्ष लैंगिक शोषण

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आग्र्यात तैनात असलेला पोलीस कॉन्स्टेबल जेबी गौतम याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. जेबी गौतम हा ताजगंज पोलीस ठाण्यातच कार्यरत होता. पीडितेने मृत्यूपूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, आरोपीने तिला पत्नीप्रमाणे चार वर्षे सोबत ठेवले होते. जेव्हा तिने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने कुटुंबाचे कारण पुढे करून नकार देण्यास सुरुवात केली. आरोपी तिला केवळ लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंधांसाठी वापरत होता आणि नंतर तिच्यापासून दुरावू लागला. व्हिडिओमध्ये ती आर्त स्वरात विचारताना दिसते की, "तो स्वतः पोलीसवाला आहे म्हणून त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही का?" या एका वाक्यातून तिने व्यवस्थेबद्दल असलेला अविश्वास आणि तिला सहन करावा लागलेला मानसिक त्रास स्पष्टपणे जगासमोर मांडला आहे.

हेही वाचा : लक्झरी कारमधून भीक मागण्यासाठी यायचा, शिफ्टमध्ये काम अन् लाखो रुपयांची कमाई, दुबईतील भिकाऱ्याला अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp