दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला, मंदिर परिसरात दोघांचा खून; नेमकं काय घडलं?
Yavatmal double murder : यवतमाळच्या जगत मंदिर परिसरात दोन गटांतील हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
मंदिर परिसरात दोघांचा खून; नेमकं काय घडलं?
Yavatmal double murder , यवतमाळ : यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत अभय उर्फ मित्तम पाठोडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या श्री जाधव याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर उमरसरा परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जगत मंदिर परिसरात दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्यात अभय उर्फ मित्तम पाठोडे याचा जागीच मृत्यू झाला. अभय हा मूळचा घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील रहिवासी असून, सध्या उमरसरा येथे राहत होता. या घटनेत श्री जाधव हा गंभीर जखमी झाला होता. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा : वेदर रिपोर्ट : महाराष्ट्रात चार जिल्ह्यांना पावसाचा इशारा, आठ जिल्ह्यांत उष्णता वाढणार
घटनेनंतर उमरसरा परिसरात खळबळ
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अवधूतवाडी पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि जखमी श्री जाधव याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना श्री जाधव याचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. या घटनेनंतर उमरसरा परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
दरम्यान, मृत अभय उर्फ मित्तम पाठोडे याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याच्यावर दोन वेळा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्यावर नेमक्या कोणत्या कारणावरून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुहेरी हत्याकांडामागील कारणाबाबत माहिती समोर आलेली नसून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.
