दुकानदाराने लिफाफा उघडला अन् बाहेर आला मनगटापासून तुटलेला हात! क्रूरतेची सीमा ओलांडणारी घटना

लुधियाना शहरातील ही घटना. दुकारनदाराला काही जणांनी एक लिफाफा दिला आणि ते निघून गेले. नंतर दुकानदाराने तो लिफाफा उघडला आणि तो हादरलाच. त्यामध्ये होता एक हात. तो हात नेमका कुणाचा होता?

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लिफाफ्यातून बाहेर आला तुटलेला हात

point

दुकानात काय घडलं?

Crime News : एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवून दिली आहे. जुन्या वादातून आणि वैयक्तिक वैमनस्यातून काही अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या नराधमांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी त्या तरुणाचा हात मनगटापासून छाटून वेगळा केला. त्यानंतर हा तुटलेला हात एका लिफाफ्यात घालून स्थानिक किराणा दुकानदाराकडे सोपवला आणि तिथून पसार झाले. या धक्कादायक घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण लुधियाना शहर हादरले आहे. 

लिफाफा उघडला अन्...

शक्ती असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. किराणा दुकानदाराने जेव्हा ते संशयास्पद पाकीट उघडले, तेव्हा आत रक्ताने माखलेला तुटलेला मानवी हात पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दुकानदाराने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा : नांदेड : 'दोन दिवस डांबून छळ...' फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह, कुटुंबियांचा गंभीर आरोप

 तरुणाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास यंत्रणांनी तातडीने कारवाई करत तो तुटलेला हात शक्ती नावाच्या तरुणाचा असल्याचे निष्पन्न केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शक्तीला अत्यंत गंभीर अवस्थेत लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रांच्या गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : महाराष्ट्रात चार जिल्ह्यांना पावसाचा इशारा, आठ जिल्ह्यांत उष्णता वाढणार

नेमकं कारण काय?

या भयंकर घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, "शक्ती नावाच्या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा हात छाटल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राथमिक तपासानुसार हा प्रकार पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक शत्रुत्वातून घडल्याचे समोर येत आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत." दरम्यान, मृत शक्ती याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : पुणे : कॅब चालकाने महिलेला निम्म्या रस्त्यात उतरवलं, व्हिडीओ काढला अन्...

सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?

पोलिसांनी सांगितले की, "तपास वेगाने सुरू असून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे सुगावे लागले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, हल्लेखोर दोन दुचाकींवरून आले होते आणि त्यांनी अत्यंत कट रचून हा हल्ला केला." सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.