पुणे : कॅब चालकाने महिलेला निम्म्या रस्त्यात उतरवलं, व्हिडीओ काढला अन्...

Pune Crime News : पुण्यात महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला मध्येच उतरवण्याचा आणि तिचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी केल्याचा कॅब चालकावर आरोप आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुणे : कॅब चालकाने महिलेला निम्म्या रस्त्यात उतरवलं

point

व्हिडीओ काढला अन्...

Pune Crime News :  पुण्यात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने कॅब चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. इच्छित ठिकाणी न पोहोचवता मध्येच उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी केल्याचा महिलेचा आरोप आहे. पुण्यातील बावधन परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पूजा दीपक साव (वय 42) या टीसीएस कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करतात. हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत जाण्यासाठी त्यांनी दुपारी एकच्या सुमारास MH 12 YB 4831 क्रमांकाची दुचाकी बुक केली होती. चालकाने सनीज वर्ल्ड, सूस या मार्गावरून गाडी घेण्यास नकार दिला. कंपनीच्या अ‍ॅपवर दाखवलेल्या मार्गानेच जाणार असल्याचे चालकाने सांगितले. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद पुढे वाढल्याचा आरोप महिलेने केला आहे.

हेही वाचा : वेदर रिपोर्ट : महाराष्ट्रात चार जिल्ह्यांना पावसाचा इशारा, आठ जिल्ह्यांत उष्णता वाढणार

प्रवासादरम्यान चालक आणि प्रवासी यांच्यातील वादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

महिलेच्या तक्रारीनुसार, चालकाने बावधन पुलावर गाडी थांबवली आणि त्यांना खाली उतरण्यास सांगितले. त्याचबरोबर प्रवासाचे पैसेही मागितले. मात्र, आपल्याला इच्छित ठिकाणी पोहोचवण्याआधीच मध्येच उतरवले जात असल्याने आपण पैसे देण्यास नकार दिला, असे महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर चालकाने त्यांच्याशी वाद घातला आणि या घटनेचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याने आपली बदनामी झाल्याचा आरोप पूजा साव यांनी केला आहे. या घटनेमुळे प्रवासादरम्यान चालक आणि प्रवासी यांच्यातील वादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या प्रकरणी पूजा साव यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली आहे. या घटनेनंतर प्रवाशांशी चालकांनी कसे वागावे आणि प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षितता कशी राखली जावी, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रवाशांशी अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी सध्या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती देण्यात आली आहे.