नांदेड : 'दोन दिवस डांबून छळ...' फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह, कुटुंबियांचा गंभीर आरोप

नांदेडमधील एका शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

Nanded News
Nanded News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नांदेडमधील घटनेने खळबळ

point

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृत्यू

Nanded News, कुंवरचंद मंडले : एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना खासगी फायनान्स बँका मात्र कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. नांदेड शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मलकौठा गावातील 40 वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी या कंपनीकडून कर्ज घेतले होते आणि कर्ज वसुलीच्या कारणास्तव त्यांना बुधवारी त्यांच्या गावातून कार्यालयात आणण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

घातपाताचा संशय

मृत चंद्रकांत यांच्या आईने या प्रकरणी अत्यंत गंभीर आरोप केले असून, हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ 7,000 रुपयांच्या वसुलीसाठी आरोपींकडून तब्बल दीड लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी केली जात होती. पैशांसाठी त्यांच्या मुलावर सतत फोनवरून दबाव टाकला जात होता आणि त्याला तब्बल दोन दिवस डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला होता.

हे ही वाचा : संजय राऊत यांचा मोठा आरोप, भाजप आमदारानेच ऑडिओ क्लीप व्हायरल केली?

आधी हत्या, मग आत्महत्येचा बनाव

पीडित कुटुंबाने असाही गंभीर आरोप केला आहे की, आरोपींनी छळ करून चंद्रकांत यांची हत्या केली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला आत्महत्येचा बनाव देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कुटुंबातील एकुलत्या एका कर्त्या तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे शिंदे कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : पाचशे कोटींच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, हसत-हसत काय बोलून गेले?

कठोर कारवाईची मागणी

हळहळ व्यक्त करत असतानाच, संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून, या अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईला गती मिळणार आहे.