सरस्वतीच्या मूर्ती विसर्जनानंतर 15 वर्षीय मुलाने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुंबई तक

crime news : एका 15 वर्षीय मुलाने स्वत:वर गोळी झाड़ून आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे नाव ओमराज कुमार असे आहे. या घटनेनं परिसराच एकच खळबळ उडाली आहे. गावातील सरस्वतीच्या विसर्जन मिरवणुकीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती, अशी माहिती मुलाच्या कुटुंबियांनी दिली. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ओमराज मिरवणुकीतून घरी परतला आणि त्याने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली

point

पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केलं

Crime news : बिहारच्या खगारिया येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 15 वर्षीय मुलाने स्वत:वर गोळी झाड़ून आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे नाव ओमराज कुमार असे आहे. या घटनेनं परिसराच एकच खळबळ उडाली आहे. गावातील सरस्वतीच्या विसर्जन मिरवणुकीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती, अशी माहिती मुलाच्या कुटुंबियांनी दिली. 

हे ही वाचा : मुंबई: दारूचं व्यसन आणि आई-वडिलांसोबत वाद... 21 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने संपवलं जीवन!

ओमराज मिरवणुकीतून घरी परतला आणि त्याने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली

घडलेल्या घटनेनुसार, मुलगा ओमराज कुमार सरस्वतीच्या मिरवणुकीतून रविवारी रात्री आपल्या घरी परतला होता. त्याने खोलीत जाऊन आपल्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.  या प्रकरणी कुटुंबाला कळाले असता, ते जेवणासाछी ओमराजला शोधण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्याची खोली आतून बंद आढळून आली होती.  

ओमराजने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, त्यांना ओमराजचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला होता. कुटुंबाने सांगितलं की, आजोबांच्या किडनी निकमी झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. ओमराजने उचललेल्या या टोकाच्या भूमिकेची माहिती त्यांना नव्हती. कुटुंबाने मुफस्सिल पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली होती. 

हे ही वाचा : आईनेच तान्हुल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं, भटक्या जनावरांनी लचके तोडले; डॉक्टरांकडे नेईपर्यंत जीव गेला

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेला होता. फॉरेन्सिक पथकाने देखील घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाजवळून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केल्याची माहिती आहे. हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचे दिसून येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp