चिमुकली अंगणात खेळत असलेली पाहून नराधमातील राक्षस जागा, विकृतीची परिसिमा गाठत...
crime news : एका तरुणाने दीड वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना तरुणाने तिचे अपहरण करत हैवानी कृत्य घडलं. नंतर पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल करत तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी तरुणाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दीड वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
काही तासांपूर्वी आणखी एका मुलीवर झाला होता सामूहिक अत्याचार
crime news : एका तरुणाने दीड वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना तरुणाने तिचे अपहरण करत हैवानी कृत्य घडलं. नंतर पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल करत तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी तरुणाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. नंतर 112 नंबर फोन करून आरोपीला पोलिसांकडे दिले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद शारीक असे आहे. ही घटना बिहारच्या गोपाळगंजमध्ये घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : मुंबईतील मालवणी परिसरात सिलिंडर ब्लास्ट, चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी
नेमकं काय घडलं?
मोहम्मद शारीक हा उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी आहे. तो गोपालगंज येथील बाईक शोरुममध्ये पेंटर म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी सांगितलं की, जलद खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल. ही घटना घडण्यापूर्वीच असाच प्रकार उघडकीस आला होता. संबंधित प्रकरणात पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. एफएसएल आणि इतर काही पथके या प्रकरणावर सतत काम करत आहेत. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा : सरस्वतीच्या मूर्ती विसर्जनानंतर 15 वर्षीय मुलाने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
काही तासांपूर्वी एका मुलीवर सामूहिक अत्याचार
असाच एक धक्कादायक प्रकार यापूर्वी देखील उघडकीस आला होता. गोपालगंजच्या नगर पोलीस ठाणे परिसरातील एका मुलीला ओलीस ठेवत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी आरोपींविरोधात एफआरआय दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना 25 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे.










