तरुणीनं प्रेमाला नकार देऊन मोबाईल नंबर ब्लॉक केला, तरुणाने घरात घुसून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं
crime news : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने एका तरुणीवर अॅसिड फेकत हल्ला केला. नंतर त्या तरुणीला एका नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य बघून आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हल्लोखोराचा घरात शिरून पीडितेवर अॅसिड हल्ला
एकतर्फी प्रकरणातून धक्कादायक प्रकार
Crime News : बिहारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने एका तरुणीवर अॅसिड फेकत हल्ला केला. नंतर त्या तरुणीला एका नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य बघून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही घटना बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील पटाही पोलीस ठाणे परिसरात घडली होती.
हे ही वाचा : चिमुकली अंगणात खेळत असलेली पाहून नराधमातील राक्षस जागा, विकृतीची परिसिमा गाठत...
हल्लोखोराचा घरात शिरून पीडितेवर अॅसिड हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटौना गावात ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. तरुणी तिच्या आईसोबत झोपली असताना, हल्लेखोर घरात शिरला आणि त्याने लाईट बंद करून तरुणीवर अॅसिड फेकत घटनास्थळावरून पळ काढला. तरुणीनं आरडाओरड केल्याचं वृत्त आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
एकतर्फी प्रकरणातून धक्कादायक प्रकार
या प्रकरणाचा पोलिसांकडे जबाब देखील नोंदवण्यात आला होता. एकतर्फी प्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. पटाही पोलिसांनी आरोपीवर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला होता, नंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मुलीने आरोपी मुलाचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता. याच रागातून तरुणाने मुलीवर अॅसिड फेकल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : Govt Job: टपाल विभागात 28,000 हून अधिक पदांसाठी भरती! 10 पास उमेदवारांसाठी मोठी संधी, कोणतीच परीक्षा नाही अन्...
आरोपी नातेवाईक
आरोपीची ओळख ही प्रियांशु कुमार अशी असून महिलेच्या चुलत भावाच्या मामाचा मुलगा आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सुरु ठेवला आहे. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली. तसेच आरोपी हा पीडितेला जबरदस्ती लग्नासाठी आग्रह धरत होता, यातूनच ही घटना घडली.










