सुट्टी दिली नाही म्हणून सिक्युरिटी गार्ड खवळला, बँक मॅनेजरला गोळ्याच घातल्या; राष्ट्रीयकृत बँकेतील धक्कादायक घटना
Security guard kills Bank Manager : बँकेतील सिक्युरिटी गार्डने सुट्टी न दिल्याने आपल्याच बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंजाब अँड सिंध बँकेत सोमवारी (16 मार्च) दुपारी 1:45 च्या सुमारास ही घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुट्टी दिली नाही म्हणून सिक्युरिटी गार्ड खवळला
बँक मॅनेजरला गोळ्याच घातल्या
राष्ट्रीयकृत बँकेतील धक्कादायक घटना
Security guard kills Bank Manager : बँकेतील सिक्युरिटी गार्डने सुट्टी न दिल्याने आपल्याच बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंजाब अँड सिंध बँकेत सोमवारी (16 मार्च) दुपारी 1:45 च्या सुमारास ही घटना घडली. रजेच्या कारणावरून मॅनेजर अभिषेक शर्मा आणि सिक्युरिटी गार्ड रवींद्र हुड्डा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी हा वाद टोकाला गेला आणि रागाच्या भरात रवींद्रने आपल्या बंदुकीतून अभिषेक यांच्या छातीवर गोळी झाडली. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : Personal Finance: तुम्हाला दर महिन्याला मिळतील 60 हजार रुपये, 'हा' गोल्डन फॉर्म्युला विसरू नका!
सुट्टी न दिल्याने घातली गोळी
रवींद्र हुड्डा हा मूळचा बागपतचा रहिवासी असून तो बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्याला काही दिवसांपासून सुट्टी हवी होती, परंतु मॅनेजर अभिषेक शर्मा यांच्याशी यावरून त्याचे वारंवार खटके उडत होते. सोमवारी दुपारी कामाच्या वेळेत पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादादरम्यान रवींद्रने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि थेट मॅनेजरवर गोळीबार केला. गोळी लागताच अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, तर आरोपी रवींद्र हातात शस्त्र फडकवत बँकेतून पसार झाला.
बँक परिसराला छावणीचे स्वरुप
बँकेच्या बाहेर असलेल्या लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच एकच खळबळ उडाली. जखमी अभिषेक यांना तातडीने दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर परिसरात आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण बँक परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.










