11 व्या वर्षी बलात्कार, 12 व्या वर्षी लग्न, 13 व्या वर्षी बनली आई; तीन वर्षानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण

मुंबई तक

Crime News : चित्रपटात शोभावी पण वास्तवात अंगावर काटा आणणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एप्रिल 2022 मध्ये हसनपुर येथील एका 11 वर्षीय बालिकेवर शेजारील तरुणाने बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीची रवानगी तुरुंगात केली होती. मात्र, काही काळानंतर आरोपी जामिनावर बाहेर आला आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

11 व्या वर्षी बलात्कार, 12 व्या वर्षी लग्न, 13 व्या वर्षी बनली आई

point

तीन वर्षानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण

Crime News : चित्रपटात शोभावी पण वास्तवात अंगावर काटा आणणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एप्रिल 2022 मध्ये हसनपुर येथील एका 11 वर्षीय बालिकेवर शेजारील तरुणाने बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीची रवानगी तुरुंगात केली होती. मात्र, काही काळानंतर आरोपी जामिनावर बाहेर आला आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : हळूच यायचा अन् शेजारी राहणाऱ्या महिलेची अंतर्वस्त्रे चोरायचा, अटकेनंतर 25 वर्षीय तरुणाने सगळंच सांगितलं

पंचायतीचा अजब न्याय आणि पैशांचा व्यवहार

न्याय मिळवून देण्याऐवजी 2023 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये पंचायत बसवण्यात आली.  अज्ञान आणि लालसेपोटी पीडितेच्या वडिलांनी 6 लाख रुपये घेऊन आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा निकाह त्याच नराधमाशी लावून दिला. हे 6 लाख रुपये आरोपीच्या एका नातेवाईकाने दिले होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहारापासून पोलीस अनभिज्ञ राहिले.

13 व्या वर्षी मातृत्व आणि नातेवाईकाचा सूड

निकाहानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच 2024 मध्ये, ही 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी एका मुलीची आई बनली. सध्या ती स्वतः लहान असूनही आपल्या दोन वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत आहे. दरम्यान, ज्या नातेवाईकाने 6 लाख रुपये दिले होते, ते आरोपी परत करू शकला नाही. या पैशांच्या वादातून संतापलेल्या त्या नातेवाईकाने जानेवारी 2026 मध्ये बाल कल्याण समितीकडे तक्रार केली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp