शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, AI अश्लील फोटो बनवून व्हायरल करण्याची धमकी

मुंबई तक

crime news: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने तीन अल्पवयीन विद्यार्थिनीवर जवळजवळ दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढंच नाहीतर त्यांनी AI चा वापर करून आक्षेपार्ह फोटो बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याबाबत कोणाला काही सांगितल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्याची धमकी दिली होती, असे त्यांनी सांगितले होते. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाकडून चुकीचा स्पर्श, मुलीचा असा आरोप

point

आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा

Crime News : शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने तीन अल्पवयीन विद्यार्थिनीवर जवळजवळ दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढंच नाहीतर त्यांनी AI चा वापर करून आक्षेपार्ह फोटो बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याबाबत कोणाला काही सांगितल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्याची धमकी दिली होती, असे त्यांनी सांगितले होते. ही घटना उत्तर दिल्लीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : 'बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात..', सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; राहुरीच्या पोट-निवडणुकीबाबतही भाष्य

शिक्षकाकडून चुकीचा स्पर्श, मुलीचा असा आरोप

विद्यार्थ्याचा आरोप असा की, आरोपींनी त्यांना केवळ मारहाणच केली नसून अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. मुली दोन तीन वर्षांपासून एका कोचिंग क्लासमध्ये शिकवण घेत होत्या. पोलिसांनी सांगितलं की, एका मुलीने असा आरोप केला की, वर्गात शिक्षक त्यांना अनेकदा चुकीचा स्पर्श करायचा. 

आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कृत्यामुळे व्यथित झालेल्या एका पीडितेनं तिच्या कुटुंबाला घटनेबाबत सांगितले होते. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी देखील पीडितेचं समुपदेशन केलं आणि नंतर आरोपी धीरज चौधरीविरुद्ध लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत अपहरण आणि हल्ला यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आणि घटनेचा शोध सुरु केला. 

हे ही वाचा : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर रुग्णालय व्यवस्थापकाकडून शरीसंबंधाची मागणी, कुटुंबीयांना जीवे मारण्याची दिली धमकी

AI चा वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणात भारतीय कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात आरोपीला अटक केली जाऊ शकते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp