नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर रुग्णालय व्यवस्थापकाकडून शरीसंबंधाची मागणी, कुटुंबीयांना जीवे मारण्याची दिली धमकी

मुंबई तक

Crime News : जीएनएम नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तिने विरोध केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता, नंतर संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण करण्याची धमकी देखील दिली होती. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरून रुग्णालय व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

न्यू सिटी रुग्णालय संचालकाने पीडितेचा केला छळ

point

तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव

Crime News : जीएनएम नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तिने विरोध केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता, नंतर संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण करण्याची धमकी देखील दिली होती. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरून रुग्णालय व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली असून घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.  

हे ही वाचा : 11 व्या वर्षी बलात्कार, 12 व्या वर्षी लग्न, 13 व्या वर्षी बनली आई; तीन वर्षानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण

न्यू सिटी रुग्णालय संचालकाने पीडितेचा केला छळ

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत, विद्यार्थिनीने सांगितलं, न्यू सिटी रुग्णालयात सात महिने ती काम करत होती. याच काळात, रुग्णालयाचे संचालक विजय कुमार यांनी तिचा छळ केला. नंतर तिला आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले आणि वारंवार तिला प्रपोज देखील केले, परंतु तिने स्पष्टपणे नकार दिला होता. 

तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव

नंतर आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. तिने नकार दिल्यावर आणि नोकरी सोडण्याची धमकी दिल्यानंतर, तो मानसिक त्रास देऊ लागला होता. रुग्णालयाबाहेर पडल्यानंतर, आरोपीनं तिचा पाठलाग करत तिचे घर गाठले होते. 

हे ही वाचा : अहिल्यानगर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, लोखंडी पकडीने चटके दिले

अपशब्द वापरून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

नंतर सर्व माहिती मिळवून त्याने तिच्यावर दबाव आणण्यास नातेवाईकांना फोन केला. जेव्हा या घटनेची माहिती मिळताच, तिने व्यवस्थापकांना असे न करण्यास सांगितले. तेव्हा आरोपीने पीडितेच्या भावासोबत देखील वाद घातला. तसेच अपशब्द वापरून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp