अहिल्यानगर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, लोखंडी पकडीने चटके दिले

मुंबई तक

Ahilyanagar Crime : या घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला जेव्हा आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावले आणि तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता तिथे गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने बेदम मारहाण केली आणि गॅसवर गरम केलेली लोखंडी पक्कड लावून तिला अमानुष चटके दिले.

ADVERTISEMENT

Ahilyanagar Crime
Ahilyanagar Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अहिल्यानगर हादरले!

point

कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार

point

लोखंडी पकडीने चटके दिले

Ahilyanagar Crime : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पारनेर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.

कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन अनेकदा अत्याचार 

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता आणि आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली होती आणि मुलगी घरी एकटी असताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. पीडितेने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली होती.

हेही वाचा : महाराष्ट्राची अवस्था बघून अस्वस्थ झालात? शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

बांबूने बेदम मारहाण , लोखंडी पक्कड गरम करुन दिले चटके

या घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला जेव्हा आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावले आणि तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता तिथे गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने बेदम मारहाण केली आणि गॅसवर गरम केलेली लोखंडी पक्कड लावून तिला अमानुष चटके दिले. या अमानुष मारहाणीनंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला असून या छळामुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp