चाकूने वार करुन खाजगी क्लासेसच्या शिक्षकाची हत्या, डोळ्यातही भोसकला चाकू; मक्याच्या शेतात आढळला मृतदेह

मुंबई तक

Crime News : एका ट्यूशन शिक्षकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत शिक्षक गावात खाजगी शिकवणी घेतो. 13 मार्च रोजी तो शिकवणीसाठी घराबाहेर पडला होता. मात्र वाटेतच त्याची हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चाकूने वार करुन खाजगी क्लासेसच्या शिक्षकाची हत्या

point

डोळ्यातही भोसकला चाकू

point

मक्याच्या शेतात आढळला मृतदेह

Crime News : एका ट्यूशन शिक्षकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत शिक्षक गावात खाजगी शिकवणी घेतो. 13 मार्च रोजी तो शिकवणीसाठी घराबाहेर पडला होता. मात्र वाटेतच त्याची हत्या करण्यात आली. मृत शिक्षकाचे नाव अबिद असे असून तो 44 वर्षांचा होता. ही हत्या इतक्या निर्दयीपणे करण्यात आली की सगळेच हादरुन गेले. गावातीलच मक्याच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : 'स्वाभिमान'मुळे देशभरातील 10 लाख महिलांचे भाग्य बदलेल - डॉ. प्रीती अदानी

मक्याच्या शेतात आढळला मृतदेह

शुक्रवारी सकाळी गावातील एका मक्याच्या शेतात आबिद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. शेतमालक शरीफ हे सिंचनासाठी शेतात गेले असता त्यांना हा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती अबिदच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्या इतक्या निर्दयीपणे करण्यात आली होती की, मारेकऱ्यांनी आबिद यांच्या डोळ्यात आणि शरीराच्या इतर भागात अतिशय निर्दयीपणे  भोसकला होता.

मारेकरी कोण?

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पूर्णिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला आहे. आबिद यांच्या सासर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कोणाशीही वैर नव्हते त्यामुळे या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून हत्येचा हा कट कोणी आणि का रचला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp