17 वर्षीय विद्यार्थ्याने तीन अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार, एकीचा गर्भपात; हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने प्रेमाचे नाटक करुन या तिघींना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक म्हणजे या तिघींपैकी एक विद्यार्थीनी गर्भवती राहिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
17 वर्षीय विद्यार्थ्याने तीन अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार
एकीचा गर्भपात
हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने प्रेमाचे नाटक करुन या तिघींना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक म्हणजे या तिघींपैकी एक विद्यार्थीनी गर्भवती राहिली होती. खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तो या मुलींना ब्लॅकमेल करायचा. तेलंगणातील नागरकुरनूल परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासादरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
हे ही वाचा : मंत्र्याच्या बेडरुममध्ये बाहेरची महिला, बायकोने फोटो काढण्याचा प्रयत्न करताच खळबळ, पण 2 दिवसात सगळं मिटलं!
ब्लॅकमेल करुन शोषण
आरोपी विद्यार्थी 2025 पासून सलग अनेक महिने या विद्यार्थिनींचे शोषण करत होता. त्याने मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. याचाच वापर करुन तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल करण्याची किंवा कुटुंबियांना पाठवण्याची धमकी द्यायचा. अखेरीस या छळाला एक मुलगी कंटाळली आणि तिने धाडस करुन ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतरच या घटनेचा खुलासा झाला.
एका मुलीचा गर्भपात
मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात समोर आले की, आरोपीने आणखी दोन अल्पवयीन मुलींचेही लैंगिक शोषण केले आहे. या तीन पीडितांपैकी एक मुलगी आरोपीच्याच कॉलेजमधील असून, इतर दोन मुली वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत आहेत. आरोपीने ज्या मुलीला गर्भवती केले होते, तिला त्याने गर्भपातासाठी स्थानिक खाजगी रुग्णालयात नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.










