आईने पाच महिन्यांच्या बाळावर फरशीने हल्ला करत डोकं फोडलं, नंतर मृतदेह स्वयंपाकघरात पुरला
Crime News : आईने आपल्याच पोटच्या लेकरावर दगडाने हल्ला करत संपवलं. नंतर मृतदेह स्वयंपाक खोलीत पुरून ठेवला होता. या घटनेनं आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघड़कीस आला आहे. आईने केलेल्या या कृत्याचे कारण समोर आले आहे. महिलेचे आणि पतीचे वाद झाले होते. त्याच रागातून हे कृत्य घडले. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कौटुंबिक वाद अन् आईनं पोटच्या लेकराला संपवलं
पश्चिम बंगालमध्ये 7 महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवलं
Crime News : आईने आपल्याच पोटच्या लेकरावर दगडाने हल्ला करत संपवलं. नंतर मृतदेह स्वयंपाक खोलीत पुरून ठेवला होता. या घटनेनं आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघड़कीस आला आहे. आईने केलेल्या या कृत्याचे कारण समोर आले आहे. महिलेचे आणि पतीचे वाद झाले होते, त्याच रागातून हे कृत्य घडले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पोलिसांना अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : मुंबई : 'मासे तू खाल्लेस की उंदराने..' दगडाने ठेचून मित्रांनी केली हत्या; 50 कचरा वेचकांच्या चौकशीतून भयंकर गुन्ह्याचा उलगडा
कौटुंबिक वाद अन् आईनं पोटच्या लेकराला संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री, पोलीस ठाणे परिसरातील पिलखानी गावात घडला होता. आरोपी महिलेचं नाव मनोरमा यादव असे आहे, तर पतीचे नाव संतोष यादव असे आहे. दोघांमध्ये वाद झाला होता, याच वादातून रागाच्या भरात महिलेनं आपल्या पाच महिन्याच्या बाळाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने हल्ला करत संपवलं, नंतर मृतदेह स्वयंपाकगृहात लपवून ठेवला होता. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी आरोपी महिलेला अटक केली होती. तपासात वापरण्यात आलेला फरशीचा तुकडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये 7 महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवलं
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कौटुंबित कलहांमध्ये वाद होऊ लागला आहे. याच कौटुंबिक कहलाचा परिणाम हा कुटुंबावर होतो, तसेच संसारावर देखील होतो. पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने आपल्या 7 महिन्यांच्या चिमुकल्या भाच्याचा जीव घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील आसनसोल कुलटी पोलीस स्टेशन हद्दीतील बालतोडिया वॉर्ड क्र. 66 मध्ये शुक्रवारी ही भयानक घटना घडल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : 'स्वाभिमान'मुळे देशभरातील 10 लाख महिलांचे भाग्य बदलेल - डॉ. प्रीती अदानी
आरोपी महिलेने 7 महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबियांनी मुलाच्या मामीवर त्याच्या हत्येचे आरोप केले आहेत.










