Gulf War News : जीव वाचवण्यासाठी समुद्रात घेतली उडी, होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतातील मरीन इंजिनीयरचा मृत्यू

मुंबई तक

Indian Marine Engineer Death : आखाती देशातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजांची वाहतूक बंद आहे. यामुळे अनेक भारतीय मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत. याचा फटका अनेक भारतीय मरीन इंजिनीअर्सना बसला आहे. अशातच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतात येणाऱ्या एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय मरीन इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

Indian Marine Engineer Death
Indian Marine Engineer Death
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Gulf War News : जीव वाचवण्यासाठी समुद्रात घेतली उडी

point

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतातील मरीन इंजिनीयरचा मृत्यू

Indian Marine Engineer Death : आखाती देशातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजांची वाहतूक बंद आहे. यामुळे अनेक भारतीय मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत. याचा फटका अनेक भारतीय मरीन इंजिनीअर्सना बसला आहे. अशातच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतात येणाऱ्या एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय मरीन इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ या जहाजावर हल्ला झाला. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी या भारतीय मरीन इंजिनीअरने समुद्रात उडी मारली आणि यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. देवनंदन सिंह असं या इंजिनीअरच नाव असून ते बिहारच्या भागलपूरचे रहिवासी होते. बुधवारी (11 मार्च) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हे ही वाचा  : मुंबई : 'मासे तू खाल्लेस की उंदराने..' दगडाने ठेचून मित्रांनी केली हत्या; 50 कचरा वेचकांच्या चौकशीतून भयंकर गुन्ह्याचा उलगडा

जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी

अमेरिका, इस्त्राईल आणि इराणच्या युद्धामुळे सबंध जग चिंतेत आहे. या युद्धामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. याचा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे. या सामुद्रधुनीतून वाहतूक बंद असल्याने अनेक जहाजे अडकून पडली आहेत. यामध्ये अनेक भारतीय मरीन इंजिनीअर्स अडकून पडले आहेत. देवीनंदन सिंह यांच्या कुटुंबाने सांगितले की, 'जहाजावर झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान सिंह यांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. यावेळी बचाव पथकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न  केला मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले.' 

इराणच्या सुसाईडल शिपने केला हल्ला

देवनंदन सिंह हे मुंबईतील ब्रावो शिप मॅनेजमेंट कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचे भाऊ कृष्णानंदन प्रसाद सिंह  यांनी सांगितले की, 'गुरुवारी सकाळी पाच वाजता कंपनीच्या एका अधिकाऱ्याचा फोन आला. यावेळी जहाजावर झालेल्या हल्ल्याची आणि भावाच्या मृत्यूची माहिती आम्हाला कळवली.' देवीनंदन यांच्या कुटुंबाने दावा केला आहे की, देवीनंदन ज्या जहाजाने परतत होते त्या जहाजावर इराणच्या 'सुसाईडल शिप'ने हल्ला केला. मात्र याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp