सहा राज्यं, असंख्य गुन्हे अन् दहा वर्षांपासून गुंगारा; इंग्रजीसह सात भाषा बोलणाऱ्या 'या' माय-लेकी कशा अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात?
Crime News : या गुन्हेगार मायलेकीं गेल्या दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत आहेत. आतापर्यंत त्यांच्या नावावर सहा राज्यांमध्ये असंख्य गुन्हे दाखल आहेत. मात्र दहा वर्षे त्यांनी पोलिसांना नेमकं कसं चकवलं? यामुळे सगळेच हैरान झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सहा राज्यं, असंख्य गुन्हे अन् दहा वर्षांपासून गुंगारा
इंग्रजीसह सात भाषा बोलणाऱ्या 'या' माय-लेकी कशा अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात?
Crime News : केरळमधील कन्नूर जिल्ह्यात 2016 मध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाचा तब्बल नऊ वर्षांनंतर छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. 60 वर्षीय वृद्ध महिला मरदान कुंजामिना यांची हत्या करून फरार झालेल्या परवीन बानू (55) आणि तिची मुलगी सकीना फातिमा (32) यांना मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या नांगलोई येथील रहिवासी असलेल्या या दोघींनी वृद्धेची हत्या करून त्यांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. या अटकेमुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे.
हे ही वाचा : लग्नाला नकार दिल्याने HIV पॉझिटिव्ह तरुणाने सूड उगवला, 'ती' आयुष्यात विसरणार नाही असं केलं कृत्य
2016 मध्ये वृद्धेची हत्या
या थरारक हत्याकांडाची सुरुवात एप्रिल 2016 मध्ये झाली होती. आरोपी आई-मुलीने स्वतःची ओळख कापड व्यापारी म्हणून सांगून कन्नूरच्या इरिककुर भागात कुंजामिना यांच्या घराजवळ एक खोली भाड्याने घेतली होती. अल्पावधीतच त्यांनी कुंजामिना यांचा विश्वास संपादन केला. 30 एप्रिल 2016 रोजी त्यांनी कुंजामिना यांना आपल्या खोलीवर बोलावले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. यानंतर कुंजामिना यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन या दोघींनी तिथून पळ काढला.
9 वर्षात सहा राज्यात गुन्हेगारी
पोलीस तपासात समोर आले आहे की, या दोघी अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी आंध्र प्रदेशातही अशाच प्रकारचे गुन्हे केले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे घरे भाड्याने घेत असत. गुन्हा करण्यापूर्वी त्या स्वतःचे मोबाईल फेकून देत आणि दुसऱ्यांच्या नावावर असलेली सिमकार्डे वापरत असत. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी केरळसह तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये आपली ओळख लपवून वास्तव्य केले होते.










