मुंबईतील धारावीत नवऱ्याने बायकोला संपवलं, व्हिडिओ कॉल करत मुलाला आईचा रक्ताळलेला मृतदेह दाखवला अन्...

मुंबई तक

Mumbai crime : मुंबईतील धारावीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली. हत्येनंतर आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे मुलाला हत्येची माहिती दिली, नंतर पत्नीचा मृतदेह दाखवला. मुलाच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai crime
Mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीवर काळी जादू करण्याचा आरोप

point

महिलेचा मृतदेह व्हिडिओ कॉलद्वारे लेकाला दाखवला

Mumbai crime : मुंबईतील धारावीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली. हत्येनंतर आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे मुलाला हत्येची माहिती दिली, नंतर पत्नीचा मृतदेह दाखवला. मुलाच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीला त्याच्या पत्नीने काळी जादू केल्याचा संशय होता. 

हे ही वाचा : मंत्र्याच्या बेडरुममध्ये बाहेरची महिला, बायकोने फोटो काढण्याचा प्रयत्न करताच खळबळ, पण 2 दिवसात सगळं मिटलं!

पत्नीवर काळी जादू करण्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृत सोलंकी (वय 52) असे आरोपीचे नाव आहे, तर पत्नी सूरजबेन सोलंकीने वारंवार वाद घालत तिच्यावर काळी जादू करण्याचा आरोप केला होता. मुलुंडमध्ये राहणारा जोडप्याचा मुलगा शिवराम सोलंकी (वय 33) हा धारावी येथील त्याच्या आईवडिलांच्या घरी आला होता तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून त्याने वडिलांना फोन केला होता. 

महिलेचा मृतदेह व्हिडिओ कॉलद्वारे लेकाला दाखवला

तक्रारीनुसार, अमृत सोलंकीने फोन उचलला आणि त्याच्या मुलाला व्हॅट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्यास सांगितले होते. आरोपीने मुलाला सांगितले की, महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आली, नंतर तिच्यावर बाटलीने हल्ला केला. त्याने कॅमेरे सूरजबेनच्या शरीरावरच ठेवला होता. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. 

हे ही वाचा : बीड : माणसं आहेत की सैतान? घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर अत्याचार, नंतर चावडीवर बांधून ठेवलं

संबंधित प्रकरणात शिवराम सोलंकी यांनी पोलिसांना फोन करून वडिलांविरुद्ध हत्येची तक्रार दाखल केली. त्याने तक्रारीत म्हटलं की, त्याचे वडील हे आईशी क्षुल्लक कारणावरून वाद घालत होते. आई जादूटोणा करत असल्याचा संशय होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दार तोडले आणि सूरजबेनला रुग्णालयात नेले. तपासादरम्यान, आरोपीने त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सोलंकीला अटक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp