बीड : 'तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस' म्हणत सासरच्यांकड़ून छळ, अखेर सुनेनं विष पिऊन संपवलं जीवन

मुंबई तक

Beed crime : बीड जिल्ह्यातील माजलगावात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तू काळी आहेस, मला आवडत नाही, असे म्हणत नवऱ्याचे पीडित महिलेला वारंवार छळ केला. याच छळाला कंटाळून महिलेनं आत्महत्या करत जीवन संपवलं. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं माजलगाव हादरून गेल्याचं चित्र आहे. 

ADVERTISEMENT

Beed crime
Beed crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये नवरा बायकोच्या संसार मिठाचा खडा

point

'तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस' म्हणत पीडितेचा सासरच्यांकडून छळ

Beed crime : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील माजलगावात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तू काळी आहेस, मला आवडत नाही, असे म्हणत नवऱ्याचे पीडित महिलेला वारंवार छळलं. याच छळाला कंटाळून महिलेनं आत्महत्या करत जीवन संपवलं. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं माजलगाव हादरून गेल्याचं चित्र आहे. 

हे ही वाचा : Assembly Election 2026: पाच राज्याच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, 'या' दिवशी कोणाचा होणार खेला होबे?

नवरा बायकोच्या संसार मिठाचा खडा

मृत महिलेचं नाव ज्योती पवार असे असून तिचा विवाह हा 2018 मध्ये झाला होता. तिच्या पतीचे नाव कृष्णा पवार असे आहे. लग्नानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरु होता, पण याच संसारात मिठाचा खडा पडला. तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला वर्णावरून अनेकदा हिणवलं. 

'तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस' म्हणत पीडितेचा सासरच्यांकडून छळ

एवढंच नाहीतर तिला माहेरहून पैसे आणण्यास तगादा लावण्यात आला होता. सासरच्या मंडळींनी तिच्यावर अनेकदा दबाव देखील टाकला होता. सोबत तिच्या वर्णावरून तिला डिवचलं गेलं, 'तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', अशा शब्दांत तिचा अवमान केल्याचा आरोप आहे. यामुळे ज्योतीला मानसिक त्रास होऊ लागला होता. 

हे ही वाचा : महाराष्ट्राची अवस्था बघून अस्वस्थ झालात? शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

विष प्राशन करून ज्योतीनं संपवलं जीवन

सासरच्या छळाला कंटाळून ज्योतीने 12 जानेवारी रोजी विष प्राशन केलं, त्यानंतर तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नंतर पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांतच उपचार सुरु असताना 18 जानेवारी रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी नवरा कृष्णा पवार, सासरा मनोहर पवार आणि सासू तारावाई पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp