म्हशीचे रेडकू बांधले नाही म्हणून वडील रागावले, 17 वर्षीय मुलाला सहन झाले नाही, त्याने वडिलांची थेट हत्याच केली
Crime News : म्हशीचे रेडकू बांधण्याच्या किरकोळ वादातून एका 17 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. काठीने बेदम मारहाण करून ही हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (10 मार्च) रात्री घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घराबाहेर मोकाट फिरणारे रेडकू न बांधल्यामुळे वडिलांनी मुलाला हटकले होते, ज्याचा राग अनावर झाल्याने मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
म्हशीचे रेडकू बांधले नाही म्हणून वडील रागावले
17 वर्षीय मुलाला सहन झाले नाही
त्याने वडिलांची थेट हत्याच केली
Crime News : आपली सहनशक्ती हळूहळू संपत चाललीये का असा प्रश्न पडावा अशी एक घटना समोर आली आहे. म्हशीचे रेडकू बांधण्याच्या किरकोळ वादातून एका 17 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. काठीने बेदम मारहाण करून ही हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (10 मार्च) रात्री घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घराबाहेर मोकाट फिरणारे रेडकू न बांधल्यामुळे वडिलांनी मुलाला हटकले होते, ज्याचा राग अनावर झाल्याने मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले.
हे ही वाचा : मुंबई : कॅमेरा असल्याचं माहिती नाही, महिलेने लिफ्टमध्ये तरुणाला किस केलं, व्हिडीओ थेट सोसायटीच्या ग्रुपवर पडला
रेडकू न बांधण्यावरुन वाद
मध्य प्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील ही घटना आहे. 45 वर्षीय रघुनाथ कोल हे आपल्या अल्पवयीन मुलाला मोकळे फिरणारे रेडकू न बांधल्याबद्दल रागावले होते. याच कारणावरून बाप-लेकामध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात मुलाने काठीने वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात रघुनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेला मुलगा घरातून पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून त्याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले.
मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार अत्यंत क्षुल्लक वादातून घडला आहे. मोकाट फिरणाऱ्या रेडकाला का बांधले नाही, यावरून वडिलांनी केलेल्या साध्या ओरड्याचे रूपांतर इतक्या मोठ्या हिंसक कृत्यात होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला लवकरच बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर करण्यात येणार आहे.










