धाराशिव : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमातच घेतलं पेटवून, भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल

मुंबई तक

धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40 वर्षीय महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यातच हा प्रकार घडल्याने परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

Dharashiv News
Dharashiv News
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमातच घेतलं पेटवून

point

भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल

Dharashiv News, गणेश जाधव : धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40 वर्षीय महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेबी किसनराव पाटील असे या महिलेचे नाव असून, त्या भूविकास बँकेच्या कर्मचारी आहेत. महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यातच हा प्रकार घडल्याने परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

अधिकाऱ्यांनी दाद घेतली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, बेबी पाटील यांची भूविकास बँकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती झाली होती. मात्र, कालांतराने भूविकास बँक अवसायनात निघाली (liquidation). तेथील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. या महिलेचा सेवेचा मोठा कार्यकाळ शिल्लक असतानाही, त्यांना थकीत शासकीय वेतन आणि इतर प्रलंबित लाभ अद्याप मिळाले नव्हते. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्या गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या आणि प्रशासकीय पातळीवर दाद मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

हे ही वाचा : पंढरपूर : काळ्या धाग्यामुळे उघडकीस आले हत्याकांड, ऐश्वर्या मिसिंग असल्याची तक्रार आरोपीनेच दिली

झेंडावंदन  कार्यक्रमातच घेतले पेटवून

प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन सुरू असतानाच, बेबी पाटील यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला आणि पेटवून दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : डोंबिवलीतील कुख्यात रील स्टारचा काळा कारनामा उघड,12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा

डॉक्टरांनी काय सांगितले?

रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सुमारे 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

हे वाचलं का?