14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवलं, नंतर रेल्वेत जबरदस्ती नेत केले लैंगिक अत्याचार, तरुण पळाला अन्...
Crime News : एका तरुणाने 14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ट्रेनच्या डब्ब्यात तिच्यावर अत्याचार केला. मुलीने नकार दिला तरी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली होती. तरुणीने कसाबसा मार्ग काढत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान आरोपीची परमेश महातो अशी ओळख पटली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाने 4 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले
नंतर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात नको तेच...
पीडितेनं कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार
Crime News : एका तरुणाने 14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ट्रेनच्या डब्ब्यात तिच्यावर अत्याचार केला. मुलीने नकार दिला तरी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली होती. ही घटना झारखंडच्या साहिबगंज येथील तळझारी पोलीस ठाणे परिसरातील महाराजपूर रेल्वे स्थानकाजवळील उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात घडली होती. तरुणीने कसाबसा मार्ग काढत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान आरोपीची परमेश महातो अशी ओळख पटली आहे.
हे ही वाचा : मुंबईतील धारावीत नवऱ्याने बायकोला संपवलं, व्हिडिओ कॉल करत मुलाला आईचा रक्ताळलेला मृतदेह दाखवला अन्...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला रेल्वेत नेत केले लैंगिक अत्याचार
घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलगी ही रेल्वे स्थानकाजवळील मेहुण्याच्या चहाच्या दुकानात झाडू मारत होती. त्याच ठिकाणी आरोपी परमेश तिथे आला आणि त्याने तिला स्टेशनवर बोलावून घेतले होते. नंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी 10 ते 15 मिनिट वेळ देखील घालवला, नंतर तिच्यावर दबाव आणू लागला.
दरम्यान, तो तिला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपी परमेशने घटनास्थळावरून पळ काढला होता. पीडितेनं देखील घरी जाण्यास यश मिळवलं आणि कुटुंबाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबांनी जीआरपी पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : बीड : माणसं आहेत की सैतान? घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर अत्याचार, नंतर चावडीवर बांधून ठेवलं
स्टेशन प्रभारी कैलाश महातो म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबाने त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली आहे. एफआरआय नोंदवण्यात येत आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपी तरुणाचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.










