बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा सवाल, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण VIDEO
Nashik News : मंत्र्यांच्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही? असा जाब विचारत संबंधित महिला कर्मचारी मैदानाकडे धावली आणि जोरदार निषेध नोंदवला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, याबाबत आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा सवाल,
गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण VIDEO
Nashik News : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मैदानावर पोलीस परेड सुरू असताना मुख्य शासकीय सोहळ्यात एक खळबळजनक घटना घडली. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या ध्वजारोहणानंतर सुरू असलेल्या भाषणादरम्यान वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने अचानक उभे राहत गोंधळ घातला. मंत्र्यांच्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही? असा जाब विचारत संबंधित महिला कर्मचारी मैदानाकडे धावली आणि जोरदार निषेध नोंदवला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, याबाबत आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, तेथे तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत माधुरी जाधव या वनविभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला तातडीने रोखून ताब्यात घेतले. देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर सुरू असलेल्या या शासकीय सोहळ्यात एका जबाबदार पदावर कार्यरत कर्मचाऱ्याने अशा प्रकारे शिष्टाचाराचा भंग केल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या घटनेचे पडसाद प्रशासकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता असून संबंधित महिला कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
गिरीश महाजन याबाबत बोलताना म्हणाले, अनावधानाने माझ्याकडे उल्लेख करायचा राहिला असेल. तसा माझा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. माझा मुद्दाम नाव डावलण्याचा हेतू नाही. मी दरवेळी भाषण करतो, तपासून पाहा. त्यावेळी असं कधी झालं नसेल.










