Maharashtra Budget 2026 : 75 हजार जागांसाठी पदभरती होणार, फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

मुंबई तक

Employment Provisions in Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारी नोकरीतील पदभरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारच्या काळात 1 लाख 20 हजार पदभरती झाली असून  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 75 हजार पदांसाठी पदभरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पदभरतीविषयी फडणवीसांनी काय घोषणा केली, जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

75 हजार जागांसाठी पदभरती होणार

point

अर्थसंकल्पात फडणवीसांची घोषणा

Employment Provisions in Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारी नोकरीतील पदभरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारच्या काळात 1 लाख 20 हजार पदभरती झाली असून  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 75 हजार पदांसाठी पदभरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पदभरतीविषयी फडणवीसांनी नेमकी काय घोषणा केली, जाणून घेऊया. 

हे ही वाचा : Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजना जाहीर

75 हजार पदांची पदभरती

फडणवीस म्हणाले की, 'गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासकीय विभागांच्या सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण आणि सुलभीकरण करण्यात आले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 20 हजार पदभरती करण्यात आली असून पुढीस कालावधीत टप्प्याटप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून आणखी ७५ हजार पदांची पदभरती करण्यात येणार आहे.' 

नागरी सेवांसाठी एआयचा वापर

फडणवीस म्हणाले की, 'आर्थिक व सामाजिक गरजांनुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवाप्रवेश नियम हे निवृत्तीपर्यंत स्वयंचलित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करुन आणि खाजगी क्षेत्रांच्या सहाय्याने नागरी सेवा पुरवण्यात अव्वल दर्जा पुरवण्याचे ध्येय प्राप्त करण्याचे आपले उद्दिष्ट आहे.'
 

हे वाचलं का?

    follow whatsapp