दिल्लीहून आला महत्त्वाचा निरोप अन् तारीखही ठरली; भाजप विधानपरिषदेवर कोणा-कोणाला पाठवणार?
Maharashtra bjp mlc candidate list delhi meeting updates : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी भाजपची अंतिम यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्लीहून आला महत्त्वाचा निरोप अन् तारीखही ठरली
भाजप विधानपरिषदेवर कोणा-कोणाला पाठवणार?
Maharashtra bjp mlc candidate list delhi meeting updates : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात मोठी हालचाल सुरू असून, उमेदवारांची अंतिम यादी 30 एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. मुंबई वगळता राज्यातील उर्वरित पाच विभागांमधून सक्षम उमेदवारांना संधी देण्याचे धोरण पक्षाने आखले आहे. सध्या विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत असून, पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पवित्रा घेतला असून ऐनवेळी नावे जाहीर करून धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या नावांच्या अंतिम निश्चितीसाठी दिल्लीत तळ ठोकून असून, केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
दिल्लीहून आला 'यादी निम्मी करा' असा निरोप; आता 14 नावांवर होणार विचार
सुरुवातीला महाराष्ट्र भाजपकडून 6 जागांसाठी जवळपास 25 ते 30 नावांची मोठी यादी दिल्लीच्या नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती. मात्र, दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडून ही यादी निम्मी करून पुन्हा पाठवण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार आता 14 नावांची सुधारित यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावेळी संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : 'भाजपचं जिल्हा उपाध्यक्ष व्हायचं असेल तर माझ्यासोबत चल..', जिल्हाध्यक्षाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप
सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा कयास असल्याने, यावेळी कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न दिल्ली स्तरावरून केला जात असून, यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे कशा प्रकारे बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









