'संजय पाटील भो$, ती बंदूक तुझ्याच ढुं%$#@ घातली जाईल..', चिडलेल्या राऊतांची जीभ पुन्हा घसरली
शिवसेना (शिंदे गट) पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटलांवर जहरी टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. पाहा राऊत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फुटीर खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर खोटे बोलत असल्याचा आरोप करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरत शिवीगाळ देखील केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
"मुलीच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली"
संजय राऊत यांनी दावा केला की, मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतःच्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी संजय दिना पाटील यांनी प्रचंड आग्रह धरला होता. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेबाबत मनसेच्या उमेदवाराच्या नावाचाही विचार सुरू होता. मात्र, मुलीला उमेदवारी न मिळाल्यास राजीनामा देण्याची भूमिका संजय दिना पाटील यांनी घेतली होती.
हे ही वाचा>> 'तीनच आमदार गायब आहेत का?', ठाकरेंच्या बैठकीवरुन शिंदे खळखळून हसले, मोठी हिंट दिली
राऊत यांनी असेही म्हटले की, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही कार्यकर्ते काम करत नसल्याचं सांगत अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली होती आणि या सर्व घडामोडी माध्यमांमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता त्या घटनांबाबत वेगळे दावे करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
"शिंदे गटात गेल्यावर खोटं बोलायची सवय लागली"
टीकेची धार आणखी तीव्र करत राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना खोटे बोलण्याची सवय लागल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी उपरोधिक आणि वादग्रस्त शब्दप्रयोगांचा वापर करत पाटलांवर निशाणा साधला.









