'कुणाला खुमखुमी असेल तर...' नागेश आष्टीकरांची दमदाटी, हाणामारीची भाषा

मुंबई तक

फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना शासनाकडून 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

ADVERTISEMENT

Nagesh Patil Ashtikar
Nagesh Patil Ashtikar
google news

बातम्या हायलाइट

point

'कुणाला खुमखुमी असेल तर...'

point

नागेश आष्टीकरांची दमदाटी

point

हाणामारीची भाषा

 

Nagesh Patil Ashtikar : फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना शासनाकडून 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, शासनाने मला 'वाय प्लस' सुरक्षा दिली आहे हे जरी खरे असले, तरी प्रोटोकॉलनुसार मिळणारी पोलिसांची गाडी मी दैनंदिन प्रवासात कधीही वापरत नाही. फार तर गावातल्या गावात तात्पुरता वापर केला जातो, परंतु बाहेरगावी जाताना मी ही गाडी अजिबात वापरत नाही. मला आजही या सुरक्षेची फारशी आवश्यकता वाटत नाही, कारण समोरून येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला जशास तसे उत्तर द्यायला आम्ही नेहमीच सक्षम आणि तयार आहोत.

...तर आमच्या वाटेला जाऊन दाखवावे

आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना इशारा देताना आष्टीकर पुढे म्हणाले की, गाफील असताना भविष्यात एखादी दुर्घटना घडलीच आणि कोणाच्या अंगात जास्तच मस्ती (किरमी) आली असेल, तर त्यांनी आमच्या वाटेला जाऊन दाखवावे. आमच्याशी खेटणाऱ्याला आम्ही अशी अद्दल घडवू की तो आयुष्यभर त्याची आठवण ठेवेल, यात तीळमात्र शंका नाही. विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी थेट शब्दांत सुनावले की, केवळ उद्धव ठाकरेंचे पाहुणे आहात म्हणूनच तुम्हाला समाजात काहीतरी किंमत आहे. अन्यथा पाठीमागून लोक काय बोलतात आणि कशी वागणूक देतात, हे सर्वांना ठाऊक आहे. असे असताना तुम्ही आम्हाला मारण्याची भाषा करताच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...

'स्वत: मैदानात या'

विरोधकांच्या धमक्यांना चॅलेंज देत आष्टीकर म्हणाले की, जर तुमच्यात खरोखरच हिंमत असेल, तर या लोकांना पुढे करण्याऐवजी स्वतः समोर या. ज्या कोणाला मला मारण्याची किंवा तुडवण्याची भाषा करायची आहे, त्यांनी स्वतः मैदानात येऊन दाखवावे. तुम्ही कुठेही आणि कधीही बोलवा, मी तिथे यायला पूर्णपणे तयार आहे. एकदा काय ते समोरासमोर होऊनच जाऊ दे, हे माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. या संपूर्ण वादात माझ्या मुलाने विरोधकांना अत्यंत चोख आणि सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच्या अंगात एवढी प्रगल्भता कुठून आली याचे मला आश्चर्य वाटते आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी या वेळी काढले.

हे वाचलं का?