Maharashtra Budget 2026 Live Updates : अजितदादांचं स्मारक उभारणार, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री भावूक

मुंबई तक

Maharashtra Budget 2026 Live Updates : कृषी क्षेत्र : ‘अॅग्री स्टॅक’ योजना राबविण्यात येणार असून या अंतर्गत शेतकरी आयडी (Farmers ID) तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी शेतकरी आयडी आधीच तयार करण्यात आले आहेत. 

ADVERTISEMENT

Maharashtra Budget 2026 Live Updates
Maharashtra Budget 2026 Live Updates
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांचं स्मारक उभारणार

point

मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करताना भावूक

Maharashtra Budget 2026 Live Updates : महाराष्ट्राचे दिवगंत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता अर्थसंकल्प सादर करण्याच जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.6) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. ते कोणत्या घोषणा करतात..याच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात.. 


कृषी क्षेत्र : ‘अॅग्री स्टॅक’ योजना राबविण्यात येणार असून या अंतर्गत शेतकरी आयडी (Farmers ID) तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी शेतकरी आयडी आधीच तयार करण्यात आले आहेत. 

‘नवीन औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा धोरण 2025’

महाराष्ट्राने ‘नवीन औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा धोरण 2025’ लाँच केले आहे. या धोरणाचा उद्देश महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) बनवणे आणि 2047 पर्यंत राज्याच्या GDP मध्ये औद्योगिक क्षेत्राचा वाटा 30% पर्यंत वाढवणे हा आहे.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार उच्च क्षमतेच्या मूल्य साखळ्या (High-capacity value chains) विकसित करणे, प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्लस्टर उभारणे आणि MSME क्षेत्राला समर्पित केंद्रे व आर्थिक मदतीद्वारे प्रोत्साहन देणे यावर भर देणार आहे. भारतामध्ये परकीय थेट गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या बळावर सरकार “Invest Maharashtra” हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. तसेच MSME आणि सेवा क्षेत्रासाठी स्वतंत्र संचालने (Directorates) स्थापन केली जाणार असून, या उपक्रमांमुळे सुमारे 5 कोटी थेट रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.

CM Devendra Fadnavis सादर केली शायरी 

हे वाचलं का?

    follow whatsapp