मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पवारांचा ढाण्या वाघ सगळा गेम फिरवण्याच्या तयारीत!

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे विजयाच्या उंबरठ्यावर असून सतीश चव्हाण यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

marathwada graduate constituency election result pratapsinh patil ncp sharad pawar victory vidhan parishad mlc election ncp sp ncp ajit pawar
प्रतापसिंह पाटील यांचा विजय
Google CTA

गणेश जाधव, धाराशिव: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्याकडे सध्या मतांची मोठी आघाडी आहे. मात्र, अद्यापही मतमोजणी सुरू असल्याने त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे धाराशिवमध्ये पदवीधरांनी मात्र आधीच जल्लोष साजरा केला आहे. शहरातील शिवाजी चौकात एकत्र येत पदवीधरांनी गुलालाची उधळण केली, फटाक्यांची आतषबाजी केली आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
 
यावेळी मुंबई तकशी बोलताना पदवीधरांनी या निवडणुकीबाबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या 18 वर्षांचा दुष्काळ संपल्याची भावना, पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळण्याची अपेक्षा आणि शरदचंद्र पवार यांच्या विचारांवरील विश्वास या भावना यावेळी पदवीधरांनी व्यक्त केल्या.

‘आजचा निकाल पदवीधरांच्या स्वाभिमानाचा दिवस’

“आजचा निकाल हा पदवीधरांच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. गेल्या 18 वर्षांपासून पदवीधरांना भेडसावणारा राजकीय दुष्काळ आजच्या निकालाने संपला आहे. पदवीधरांना स्वच्छ आणि निष्कलंक चेहरा मिळाला असून, त्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा नेता निवडून येत आहे,” अशी भावना पदवीधरांनी व्यक्त केली.

हे ही वाचा>> विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला हाती, कोणी मिळवला प्रचंड मोठा विजय?

‘मराठवाडा पदवीधर मतदारसंघ शरदचंद्र पवारांचा असल्याचे पुन्हा सिद्ध’

“मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यापीठाच्या नामांतरापासून या भागातील अनेक लोक शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी जोडले गेले आहेत. त्यांच्याच विचारांचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येत असल्याचा आनंद आहे,” असेही पदवीधरांनी सांगितले.

‘बॅलेट पेपरमुळे लोकशाही जिवंत राहिली’

या विजयाचे श्रेय बॅलेट पेपरला आणि शरदचंद्र पवार यांच्या विचारांना दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत पदवीधर म्हणाले, “ईव्हीएमच्या माध्यमातून आकर्षक चेहरे आणि आश्वासने दाखवून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याची आमची भावना होती. मात्र, बॅलेट पेपरमुळे आज लोकशाही जिवंत राहिली, असे म्हणावेसे वाटते. या निकालातून पदवीधरांनी आपला कौल स्पष्ट केला आहे.”

हे ही वाचा>> विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी महत्वाची अपडेट

एकूणच, प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाच्या वाटचालीदरम्यान धाराशिवमध्ये झालेल्या जल्लोषातून पदवीधरांचा उत्साह दिसून आला.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार गट तसेच शिवसेना (UBT) यांच्यात लढत होती. 

  • सतीश चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
  • दिलीप घुगे – शिवसेना (UBT)
  • प्रतापसिंह पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

या तीन उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळविण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाणांना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.