दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का, किती मतांनी पराभूत? मस्साजोगच्या निवडणुकीत काय घडलं?

मुंबई तक

Santosh Deshmukh wife Ashwini Deshmukh suffers defeat : मस्साजोगचे माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मस्साजोगमध्ये पराभव झालाय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..

ADVERTISEMENT

Santosh Deshmukh wife Ashwini Deshmukh suffers defeat
Santosh Deshmukh wife Ashwini Deshmukh suffers defeat
google news

बातम्या हायलाइट

point

दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का

point

किती मतांनी पराभूत? मस्साजोगच्या निवडणुकीत काय घडलं?

Santosh Deshmukh wife Ashwini Deshmukh suffers defeat : मस्साजोग येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर समोर आला असून स्वरूपानंद देशमुख यांनी या निवडणुकीत  विजय मिळवलाय. या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव केला. स्वरूपानंद देशमुख यांनी आश्विनी देशमुख यांच्यावर 92 मतांनी मात करत विजय संपादन केला. मस्साजोग ग्रामपंचायतीच्या या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते आणि या निकालामुळे आता गावातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने अश्विनी देशमुख यांना सहानभूती मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही.

केज तहसील कार्यालयात पार पडली मतमोजणी प्रक्रिया

या पोटनिवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया केज तहसील कार्यालयात अत्यंत चोख बंदोबस्तात पार पडली. प्रशासनाकडून मतमोजणीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये एकूण 3 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया एकाच राऊंडमध्ये पार पडली, ज्यामुळे निकाल लवकर हाती आला. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक पाहायला मिळत होती. केज तहसील कार्यालयाच्या परिसरात निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठा जनसमुदाय जमला होता आणि जसा निकाल जाहीर झाला, तसा विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

हेही वाचा : पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण

 मस्साजोगमध्ये 84 टक्के विक्रमी मतदान आणि चुरशीची लढत

मस्साजोग सरपंच पदासाठी काल झालेल्या मतदानात ग्रामस्थांनी मोठा उत्साह दाखवला होता. गावातील एकूण 2080 मतदारांपैकी तब्बल 1744 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता, ज्यामुळे एकूण 84 टक्के इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले. मतदानाची ही मोठी टक्केवारी पाहता ही लढत अत्यंत चुरशीची होणार याचा अंदाज आधीच वर्तवण्यात येत होता. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या पत्नी आश्विनी देशमुख निवडणूक लढवत असल्यामुळे या निवडणुकीला भावनिक पदरही होता, मात्र मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने आपला कौल दिला आहे.

हे वाचलं का?