महाराष्ट्र विधानमंडळाला धमकीचे ई-मेल; मेट्रो स्टेशन, न्यायालय आणि विधान भवनावर हल्ल्याची धमकी

मुंबई तक

Maharashtra Vidhanmandal threat News : मिळालेल्या माहितीनुसार, विधानमंडळाच्या अनेक अधिकृत ई-मेल आयडींवर हे धमकीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या असून विधान भवन परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Vidhanmandal threat News
Maharashtra Vidhanmandal threat News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : मेट्रो स्टेशन न्यायालय आणि विधान भवनावर हल्ला करणार

point

धमकीचा मेल आल्यानंतर पोलिसांनी दरवाजे केले बंद

Maharashtra Vidhanmandal threat News ,मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिकृत ई-मेल आयडींवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या ई-मेलमध्ये मेट्रो स्टेशन, न्यायालय तसेच विधान भवनावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : आठवीचा मुलाला शाळेतून घरी परतताना तिघांनी घेरलं, एकाने चाकूने केले वार, वडिलांनी सांगितला घटनेचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, विधानमंडळाच्या अनेक अधिकृत ई-मेल आयडींवर हे धमकीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या असून विधान भवन परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. परिसरात तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस सतर्कतेने सर्व खबरदारी घेत आहेत. तसेच परिसराची सखोल तपासणीही करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास संबंधित सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस करत असून धमकीचे ई-मेल कोणी पाठवले याचा शोध घेतला जात आहे.

मुंबई विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरात सर्च आपरेशन सुरू केले आहे. सध्या विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन होईपर्यंत कोणालाच आत सोडले जाणार नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात येत असतात. त्यामुळे पोलिसांकडून सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp