आठवीचा मुलाला शाळेतून घरी परतताना तिघांनी घेरलं, एकाने चाकूने केले वार, वडिलांनी सांगितला घटनेचा थरार

मुंबई तक

Crime News : एका आठवीच्या विद्यार्थ्याला सायकलवरुन घरी परतताना तीन तरुणांनी थांबवले आणि त्याच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुलाला एका नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगा शाळेतून घरी परतत असताना तिघांनी घेरून एकाने चाकूने वार केले

point

'मुलाचे कोणाशीही शत्रूत्व नव्हते'

Crime News : एका आठवीच्या विद्यार्थ्याला सायकलवरुन घरी परतताना तीन तरुणांनी थांबवले आणि त्याच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुलाला एका नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. ही घटना हरयाणातील कुरुक्षेत्र परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : मुंबई : मानखुर्दमध्ये फालुदा विक्रेत्याची चाकूने सपासप वार करुन हत्या, हादरवून टाकणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

मुलगा शाळेतून घरी परतत असताना तिघांनी घेरून एकाने चाकूने वार केले

ज्ञानेंद्र यांनी पोलिसांना सांगितलं की, ते सेक्टर 3 मध्ये कपडे इस्त्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा हा गावातील सरकारी शाळेत इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत होता. त्यांचा मुलगा हा सायकलवरून शाळेतून घरी परतत असताना तीन तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलाला घेरलं. आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत एकाने चाकूने वार करत संपवलं, तसेच रक्तस्त्राव झाला होता. 

हे ही वाचा : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर झुडपात सामूहिक अत्याचार, पीडित तरुणी शेतात आढळली

'मुलाचे कोणाशीही शत्रूत्व नव्हते'

घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मुलाचे कोणीही शत्रू नव्हते आणि त्याचे कोणाशी वाद झाला नव्हता. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, तो सध्या धोक्यातून बाहेर आलेला आहे. दरम्यान तपासण्या महिन्याभरातच सुरु होतील. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली आणि तक्रारदारांच्या आधारे पुढील प्रकरणाची कारवाई केली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp