शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर झुडपात सामूहिक अत्याचार, पीडित तरुणी शेतात आढळली

मुंबई तक

crime news : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर एका झुडपात हैवानांनी लैंगिक अत्याचार केला. संबंधित प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी ही शेतात आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगी तिच्या भावाला घेऊन शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली

point

दोन तरुणांनी तिला झुडपात नेत तिची अब्रू लुटली

crime news : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर एका झुडपात हैवानांनी लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना ही हापूरमधील धौलाना पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हापूरमधील धौलाना येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे, गावातील महिलांनी भर चौकात शिक्षकाला चपलेने बदडले; भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

मुलगी तिच्या भावाला घेऊन शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली

पीडित तरुणी ही शेतात आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे. घडलेल्या घटनेनुसार, मंगळवारी दुपारी गावातील एक किशोरवयीन मुलगी तिच्या छोट्या भावाला घेऊन शेळ्या चारण्यासाठी एका दाट झाडांचा भाग असलेल्या ठिकाणी गेली होती. काही वेळाने मुलीने तिच्या धाकट्या बहिणीला शेळ्या घेऊन घरी परतण्यास सांगितले आणि ती पुढे निघून गेली होती. 

दोन तरुणांनी तिला झुडपात नेत तिची अब्रू लुटली

बराच वेळ झाला तरी मुलगी परतलीच नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांना काळजी वाटली असता, त्यांनी तिचा शोध सुरु केला. सायंकाळी उशिरा शोध सुरु झाला असता, ती मुलगी गावाजवळील एका शेतात अस्वस्थ अवस्थेत आढळून आली होती. कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर पीडितेनं सांगितलं की, गावातील दोन तरुणांनी तिला झुडपात नेत तिची अब्रू लुटून घटनास्थळावरून पळ काढला होता. 

हे ही वाचा : नागपूर: आचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी 6 महिन्यांनंतर जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर, चौघांना अटक

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेले आणि दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp