अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे, गावातील महिलांनी भर चौकात शिक्षकाला चपलेने बदडले; भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार
Bhandara Crime News, व्येंकटेश दुडमवार : विद्यामंदिर संबोधल्या जाणाऱ्या शाळेतच चक्क लैंगिक विकृतीचा काळोख पसरविणाऱ्या एका नराधम शिक्षकाला संतप्त ग्रामस्थांनी चपलेने बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी उघडकीस आली. हा प्रकार लक्षात येताच संतप्त गावकरी आणि महिलांनी त्याला भर चौकात चपलेने बदडून काढले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे
गावातील महिलांनी शिक्षकाला भर चौकात चपलेने बदडले
भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार
Bhandara Crime News, व्येंकटेश दुडमवार : विद्यामंदिर संबोधल्या जाणाऱ्या शाळेतच चक्क लैंगिक विकृतीचा काळोख पसरविणाऱ्या एका नराधम शिक्षकाला संतप्त ग्रामस्थांनी चपलेने बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी उघडकीस आली. हा प्रकार लक्षात येताच संतप्त गावकरी आणि महिलांनी त्याला भर चौकात चपलेने बदडून काढले. त्या शिक्षकाला पोलिसांना स्वाधीन करून तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्या आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शिक्षक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
हे ही वाचा : 'तुझ्या पतीला मारुन टाकलं, मृतदेह पुलाखाली आहे', हत्येनंतर प्रियकराने दिली अपडेट; पत्नीनेच थंड डोक्याने कट रचला
महिलांनी चपलेने मारले
अनिल जगन राठोड (५४) असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वीच तो या शाळेत बदलून आला होता. वर्ग सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना बाहेर काढून तो विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. एवढेच नाही तर, त्यांच्यासोबत वर्गात विकृत चाळेही करायचा. हा प्रकार वाढल्यावर काही विद्यार्थिनींनी पालकांना माहिती दिली. ही वार्ता गावभर पसरताच संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली. काही महिलांनी त्याला शाळेबाहेर काढून या प्रकाराबद्दल विचारणा केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून महिलांचा पारा भडकला. त्यांनी पकडून चपलांनी बदडून काढले. संतप्त गावकऱ्यांनी आणि पालकांनीही त्याला या कृत्याचा जाब विचारला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तक्रारीत गंभीर अन् धक्कादायक आरोप
या शिक्षकाविरुद्ध पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वर्गातील मुलांना वर्गाबाहेर काढून तो मुलींसह दार बंद करून आत असायचा. अश्लील व्हिडिओ दाखवून नको ते कृत्य करायचा. मागील जुलै महिन्यापासून त्याचा हा प्रकार सुरू होता. नापास करण्याची आणि घरी सांगितल्यास मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देऊन तो हे प्रकार करायचा.










