'तुझ्या पतीला मारुन टाकलं, मृतदेह पुलाखाली आहे', हत्येनंतर प्रियकराने दिली अपडेट; पत्नीनेच थंड डोक्याने कट रचला

मुंबई तक

Crime News : या धक्कादायक प्रेम कहाणीची मुळे गुजरातमध्ये रुजली होती. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, कौशलेंद्रची पत्नी कुसुम सिंह ऊर्फ रीना सिंह आणि संदीप पटेल यांची भेट गुजरातमध्ये झाली होती. तिथूनच त्यांच्या संवादाला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. ते दोघेही सतत एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र काही काळाने कौशलेंद्रला या संबंधांची कुणकुण लागली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तुझ्या पतीला मारुन टाकलं, मृतदेह पुलाखाली आहे',

point

हत्येनंतर प्रियकराने दिली अपडेट; पत्नीनेच थंड डोक्याने कट रचला

Crime News : अनैतिक संबंधांच्या मार्गात पती हाच सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याने, त्याला कायमचे संपवण्यासाठी पत्नीने अत्यंत थंड डोक्याने हे मृत्यूचे जाळे विणले होते. हत्येनंतर प्रियकराने पत्नीला 'तुझ्या पतीला संपवले असून त्याचा मृतदेह पुलाखाली फेकला आहे' असा फोन करून माहिती दिली, ज्यावरून या गुन्ह्यातील क्रूरता स्पष्ट होत आहे. या खळबळजनक आणि गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील धक्कादायक खुलासाने सर्वांचेच डोळे पांढरे झाले आहेत. 

नदीच्या पुलाखाली तरुणाचा मृतदेह आढळल्याने उडाली होती खळबळ 

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, 5 मार्च रोजी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील जैतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नदीच्या पुलाखाली तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. कौशलेंद्र प्रताप सिंह ऊर्फ डब्लू असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याच्या खुणा होत्या. मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. जैतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक कुमार पांडेय आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि स्थानिक पातळीवर केलेल्या चौकशीनंतर, संशयाची सुई कौटुंबिक वादाकडे वळली आणि तपासाला वेगळी दिशा मिळाली.

हेही वाचा : 'तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील..' मित्रांनी केली चेष्टा, तरुणीने मुंबईतील राहत्या घरातच स्वत:ला संपवलं

या धक्कादायक प्रेम कहाणीची मुळे गुजरातमध्ये रुजली होती. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, कौशलेंद्रची पत्नी कुसुम सिंह ऊर्फ रीना सिंह आणि संदीप पटेल यांची भेट गुजरातमध्ये झाली होती. तिथूनच त्यांच्या संवादाला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. ते दोघेही सतत एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र काही काळाने कौशलेंद्रला या संबंधांची कुणकुण लागली. यावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडू लागले. जेव्हा कौशलेंद्रने या नात्याला कडाडून विरोध केला, तेव्हा दोन्ही प्रेमींना जाणीव झाली की तो त्यांच्या मार्गातील अडसर आहे. यानंतर दोघांनी संगनमत करून कौशलेंद्रचा काटा काढण्याचे कारस्थान रचले.

हे वाचलं का?

    follow whatsapp