विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणारे बॉलिवूड कलाकार, पाहा यादी; काही जण थेट आंदोलनात उतरले
cjp student protest bollywood celebrities support : नीट परीक्षांतील कथित गैरप्रकारांविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. काही कलाकारांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर काहींनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणारे बॉलिवूड कलाकार, पाहा यादी
काही जण थेट आंदोलनात उतरले
cjp student protest bollywood celebrities support : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता इम्रान खान बुधवारी मुंबईतील विद्यार्थी मोर्चात सहभागी झाला. पावसात शेकडो विद्यार्थ्यांसोबत चालत त्याने आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्यासोबत सेल्फी काढले आणि त्यांच्याशी संवाद साधला. आंदोलनादरम्यान एका स्वतंत्र पत्रकाराशी बोलताना इम्रान खान म्हणाला की, "कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला नाकारण्यात आले. त्यांच्या पाठिंब्यासाठी मी येथे आलो आहे. हा आपल्या देशाच्या भविष्यासाठीचा लढा आहे. भारतमातेची सर्व मुले आज येथे उभी आहेत."
हेही वाचा : UK तून मराठी तरुण थेट दिल्लीत.. आंदोलनात इंग्लिशमध्ये धडाधड काय बोलला?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भटने घेतली भूमिका
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत 20 जुलैच्या आंदोलनातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्या पोस्टमध्ये तिने, "20 जुलै रोजी अनेकांची हाडे तुटली आणि संपूर्ण देशाचे हृदय तुटले. हे लक्षात ठेवा," असे लिहित आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. आलिया भट्टनेही विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत, "गेल्या काही दिवसांपासून माझे ह्रदय वारंवार तुटले. प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक स्वप्न, एका कुटुंबाची आशा आणि असंख्य त्याग दडलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकडून... भविष्य त्यांचेच आहे. जय हिंद," असा संदेश दिला.
हेही वाचा : पुणे हादरले, 23 वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या खुनाचा घेतला सूड; 28 वार करून हत्या, धक्कादायक उलगडा










