UK तून मराठी तरुण थेट दिल्लीत.. आंदोलनात इंग्लिशमध्ये धडाधड काय बोलला?
CJP Jantar Mantar Protest : यूकेमधून परतलेल्या अहिल्यानगरच्या तरुणाने दिल्लीतील आंदोलनात इंग्रजीतून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलन, लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्याने स्पष्ट भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
UK तून मराठी तरुण थेट दिल्लीत..
आंदोलनात इंग्लिशमध्ये धडाधड काय बोलला?
CJP Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा एक तरुण आपल्या इंग्रजी भाषणामुळे चर्चेत आला. स्वतः तीन वर्षे यूकेमध्ये मास्टर्स शिक्षण घेतल्याचा आणि स्कॉटिश सरकारमध्ये काम केल्याचा दावा करणाऱ्या या तरुणाने आंदोलनस्थळी केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि आंदोलनावर झालेल्या कथित कारवाईवर तीव्र शब्दांत टीका केली. "मी यूकेमध्ये होतो, पण देशाची परिस्थिती पाहून परत आलो. इथं जे दिसत आहे त्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं वाटलं," असं तो म्हणाला. त्याने सांगितलं की, तो अहिल्यानगरहून तीन दिवसांपासून दिल्लीत आंदोलनात सहभागी असून, आंदोलकांना पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचा आरोप त्याने केला. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावा करत त्याने याबद्दल संताप व्यक्त केला.
हेही वाचा : Personal Finance: वयाच्या 30, 40 आणि 50 व्या वर्षी बँकेत किती असावी बचत?
अल्पवयीन मुलींवरही बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप
या तरुणाने आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमधील काही लोकांकडून आंदोलकांवर मारहाण झाल्याचा आरोप केला. हे लोक पोलीस नसल्याचा दावा करत त्यांनी आंदोलकांवर हल्ला केल्याचं तो म्हणाला. अल्पवयीन मुलींवरही कथितपणे बळाचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख करत, अशा प्रकरणांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्याने केली. लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना आहे, मग आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला, असा सवालही त्याने उपस्थित केला. आंदोलन करणारे विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून आपल्या हक्कांसाठी लढत असल्याचं त्याने सांगितलं.
हेही वाचा : दिल्ली: जंतर मंतरजवळ रात्री अचानक दगडफेक, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमनेसामने










